शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खामोना-अहेरी मार्गावर वाहनचालकांना करावा लागतो त्रासदायक प्रवास

By admin | Updated: August 14, 2016 00:40 IST

रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला,...

रस्त्यावर खड्डेच खड्डे : सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देईनागोवरी : रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला, याचा अंदाज बांधता येतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चांगले असणे आवश्यक असते. मात्र खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नरकयातनांचा प्रवास करावा लागत आहे. परंतु सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.राजुरा तालुक्यातील खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुगी करणे आवश्यक असते. परंतु बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्डा किती खोल आहे, याचा नेमका अंदाज वाहनधारकांना येत नसतो. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडले आहेत. शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी अहेरी, खामोना येथे जात असल्याने चांगल्या रस्त्याअभावी त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावरून त्या त्या परिसरातील विकासाची दिशा ठरत असते. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांना आज मोठ्या प्रमाणात अवकळा आल्याने रस्त्यांचा विकास गेला कुठे, हा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही. खामोना-अहेरी मार्गाची गेल्या अनेक दिवसापासून दुरवस्था झाल्याने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र सुस्तावलेल्या बांधकाम विभागाला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी खामोना येथील पोलीस पाटील विजय पादे, उपसरपंच रेखा पिंपळशेंडे, बंडू जेऊरकर, लघुत्तम सातपुते, आकाश कातकर, घनश्याम उरकुडे, दौलत लोणारे, राजू कामटे, सूरज पादे, श्याम कातकर, कवडू सातपुते, प्रकाश मोरे, विलास सातपुते, चेतन लोणारे, राजेंद्र पिंपळकर व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)रस्त्यात खड्डा का खडड्यात रस्ता कळेनाराजुरा तालुक्यातील खामोना - अहेरी मार्गाची एवढी बिकट अवस्था झाली आहे की, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता आहे, हे क्षणभर चुकल्यासारखे वाटते. रस्त्यावरील खड्डे वाहनधारकाच्या जीवावर उठले आहे. या रस्त्याचे पूर्णत: बारा वाजल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष का देत नाही, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून अनुउत्तरीतच आहे.