शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरला स्मार्ट सिटी बनविणे हे स्वप्न

By admin | Updated: April 17, 2017 00:36 IST

वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावे ओस पडली आणि शहरे बकाल झाली. या शहरांच्या स्वास्थ्यासाठी योजना आखण्यात आल्या नाही.

मुख्यमंत्र्यांची सभा : वायफाय सिटी बनविण्याचे आश्वासनचंद्रपूर : वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावे ओस पडली आणि शहरे बकाल झाली. या शहरांच्या स्वास्थ्यासाठी योजना आखण्यात आल्या नाही. चंद्रपूर या महानगराचे रूप पालटवून या शहराला स्मार्ट सिटी बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कले.चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्थानिक क्लब ग्राऊंडवर झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होती.यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यावर प्रथमच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना आखण्यात आली. खाजगी क्षेत्रातील उत्पादकतेला सामूहिक क्षेत्राचे रूप देवून देशाचे उत्पन्न वाढविण्यचा प्रयत्न झाला. मोदी सरकारने देशातील शहरांचा बकालपणा घालविण्यासाठी योजना आखल्या आहेत. २८ शहरात एकाच वेळी अटल अमृत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. शहर रोगमुक्त करण्यासाठी सांडपाण्यावार प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प नागपुरात उभारला. घनकचरा ही संपत्ती मानून या कचऱ्याचे रूपांतर खतात केले गेले. या खताचा ब्रँड तयार करण्यात आला. ग्रीन कोल ही संकल्पना अस्तित्वात आणून रोजगाराचा नवा मार्ग निर्माण केला. कचऱ्यातून वीज निर्मीतीचाही प्रकल्प केला. हे सर्व प्रकल्प चंद्रपुरात व्हावे हे आपले स्वप्न आहे.आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पंतप्रधान यो योजनेतून सर्वांना घरे मिळावी यासाठी निवडणुका संपताच गरजुंसाठी घरांचे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशी सूचनाही त्यांनी स्थानिक नेत्यांना केली. ना. सुधीर मुनगंटीवार यांचे या शहरात उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे स्वप्न आहे. त्या सोबतच या शहराला वाय-फाय सिटीचा दर्जा देण्याचे आश्वासनही मुख्यंमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिले. चंद्रपूरच्या विकासासाठी मुलभूत सुविधांवर खर्च करण्याचे नियोजन असून शहरातील लोकसंख्येला मानव विकासात परावर्तीत करण्याचे आपले स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, मागील अडीच वर्षात शहरात १६९ कोटी रूपयांची विकास कामे घडली. त्यासाठी ना. मुनगंटीवारांनी प्रचंड निधी आणला. या विकास कामातून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे ते म्हणाले.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून शहरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. शुद्ध पाणी, नद्यांची स्वच्छता, पर्यावरण, रस्ते, बाबा आमटे अभ्यासिका, बाबूपेठ उड्डाण पूल, महानगर पालिकांच्या इ-लर्निग शाळा यासह अनेक बाबींसाठी नियोजन करून योजना आकारास येत असल्याचे ते म्हणाले. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)