शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्नेहल रामटेके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

चंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती महोत्सव साजरी करण्यासाठी शहरातील बौद्ध मंडळे, सामाजिक ...

चंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती महोत्सव साजरी करण्यासाठी शहरातील बौद्ध मंडळे, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक स्नेहल रामटेके हेच कायम राहणार असल्याचा एकमुखी ठराव सिद्धार्थ हायस्कूल, घुटकाळा वॉर्ड चंद्रपूर येथे पार पडलेल्या समाजाच्या आमसभेत पारित करण्यात आला.

नगरसेवक स्नेहल रामटेके यांची २०१९ मध्ये आमसभेच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली शतकोत्तर समितीचे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीचा जयंती कार्यक्रम घेता आला नाही. तरी समाजाच्या विविध घटकांशी सल्ला मसलत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संरक्षण भिंतीचे बांधकामानिमित्त समाजातील घटकांना घेऊन मनपा आयुक्त यांच्याशी बैठका घेत असताना शतकोत्तर समितीच्या कार्यकारी मंडळाने स्नेहल रामटेके यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यावर अविश्वास घडवून आणला होता. तो अविश्वास असंवैधानिक असल्याचे ठरवून आमसभेतून निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याला आमसभेच्याच माध्यमातून पदमुक्त करण्याचा अधिकार आमसभेलाच असल्याने कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करीत आमसभेने स्नेहल रामटेके यांना पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कायम करण्यात आले. संचालन व प्रास्ताविक जितेंद्र डोहणे यांनी केले.

यावेळी आंबेडकरवादी नेते खुशाल तेलंग, कोमल खोब्रागडे, दादाराव उंदीरवाडे, रामसिंग सोहेल, एन. डी. पिंपळे, नेताजी भरणे, सुरेश नारनवरे, भन्ते कृपाशरण, सिद्धार्थ वाघमारे, देशक खोब्रागडे, तथागत पेटकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.