शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

बालमनावर डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजवणे आवश्यक - ज्ञानेश्वर डुकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:55 IST

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालमनावर रुजवणे आवश्यक असल्याचे मत

भद्रावती : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालमनावर रुजवणे आवश्यक असल्याचे मत येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांनी केले. सुमठाना येथील त्रिरत्ननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. कृणाल पथाके होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, प्रणय रायपुरे, मुरली वांढरे, आदी मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ज्ञानेश्वर डुकरे म्हणाले, डॉ. बाबाबासाहेबांनी संविधानातून सर्व प्रकारच्या आर्थिक पिछाडीवर असलेल्या समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे खालच्या स्तरातील नागरिकांनीही आपली विद्वता दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली आहे. हे केवळ बाबासाहेबांमुळेच होवू शकले. त्यामुळे त्याचा आदर्श ठेवून नवीन पिढीने वाटचाल करावी, असे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी तर शैलेश नगराळे यांनी आभार मानले. (शहर प्रतिनिधी)