शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागेपर्यंत लीज देऊ नका

By admin | Updated: April 14, 2017 00:50 IST

भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे.

प्रकरण अवैध उत्खननाचे : मुदत संपल्यावरही सुरू होते कामचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर उत्खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याने हे प्रकरण न्यायलयात सुरु आहे. त्यामुळे प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत उत्खननासाठी लीज देऊ नये, अशी मागणी नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी केली आहे.भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील शेतजमीन व्यंकटेश एकरे यांनी चंद्रकांत वासाडे यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्टयाने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नूतनीकरण न होताही वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून उत्खनन सुरू केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर शेतमालकाने खनिकर्म विभागाला पत्र देवून उत्खनन थांबविण्याची विनंती केली. चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावाही दाखल केला. हस्ताक्षरतज्ज्ञांकडून ही बाब तपासल्यावर खरा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वरोरा पोलिसात २३ जानेवारी २००२ ला शेतमालकाने तक्रार दिली. त्यावर काहीच दखल न घेतल्याने पुन्हा २७ जुलै २००२ ला दुसरी तक्रार केल्यावर पोलिसांनी दखल घेतली व वासाडे यांच्यावर गुन्हे नोंदविले. या प्रकरणाचा फौजदारी खटला सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीतही चंद्रकांत वासाडे यांच्याकडून लीज मिळविण्यचा प्रयत्न केला जात आहे. उत्खनण करताना धुरा आणि डिमार्केशन करणे आवश्यक असते. मात्र उत्खननात शेताचा धुरा आणि अ‍ॅप्रोच रस्ताही आता अस्तित्वात नाही. कसलेही डिमार्केशन नसल्याने नेमके किती उत्खनन झाले याचा अंदाज येणे कठीण आहे. यामुळे त्यांना पुन्हा लीज दिल्यास नियमाचे उल्लंघन होऊन शासनाची लूट होण्याची शक्यता अधिक आहे. आपण स्वत: शेतगालक असून नियमित शेतसाराही भरत आहोत. २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा शेतमालकांना देण्याचा निर्णय होऊनही दिला जात नसल्याने न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आहे. प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)