चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण २ मे २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीस लागली. परंतु, प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या घटली होती. परंतु पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्याचा पाझिटिव्ही रेट हा २.९५ होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील ४. २० झाला. एप्रिल महिन्यात तर पॉझिटिव्हिटी रेट ३२ वर पोहोचला आहे. तपासणी करणाऱ्यांमध्ये बहुतांश जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे हा संसर्ग किती वेगाने वाढत आहे याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५१ हजारांवर पोहोचली आहे, तर १४ हजारांच्या वर सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बॉक्स
डेथ रेटमध्येही झाली वाढ
सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाबाधित मृतकांची संख्या अल्प होती, मात्र आता दररोज २५ च्या वर रुग्णांचा मृत्यू होत आहे. मार्च २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा डेथ रेट ०.६९ होता. आता त्यामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा डेथ रेट १.४६ वर पोहोचला आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
असा आहे पॉझिटिव्ही रेट
जानेवारी २.९५
फेब्रुवारी ४.२०
मार्च ६.९२
एप्रिल ३२
बॉक्स
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या चिंताजनक
आजपर्यंत शहरी भागातच कोरोना पसरला होता, मात्र आता याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५१ हजारांवर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १८ हजारांच्या वर आहे. बहुतांश ठिकाणी एकाला बाधा झाली तरी त्यांच्या कुटुंबातील इतर लोकही पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी घरी गेल्यानंतर पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोट
जानेवारी महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.९५ होता. आता तो ३२ वर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझरने सतत हात स्वच्छ धुवावे.
डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, चंद्रपूर