शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

काँग्रेसचे जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:10 IST

राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारचा निषेध : पुष्पगुच्छ देऊन नागरिकांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.बल्लारपुरात मोर्चाशहर युवक काँग्रेस कमिटीतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दिलीप माकोडे, नगरसेवक भास्कर माकोडे, युवक काँग्रेसचे गट नेता सचिन जाधव, कमलेश माकोडे, अमित पाझरे, निशांत आत्राम, अ‍ॅड. पवन मेश्राम, चंदन तिलोकाणी, दिपक चव्हाण, सुनील युवने, धर्मेंद्र यादव, राकेश लांजेवार, फिरोज सिद्दीकी, सुनील नगराळे आदी सहभागी झाले होते.गोंडपिपरीत काँग्रेसकडून धरणेयेथील तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने राज्य शासनाविरोधात धरणे देण्यात आले. वाढती महागाईमुळे जनता होरपळत असून गोरगरीबांची जाण न ठेवणाºया शासनाचा निषेध या ठिकाणी नोंदविण्यात आला. यात तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, कृउबा सभापती सुरेश चौधरी, देविदास सातपुते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाºयांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध गांधीगिरी करून स्थानिक व्यवसायीक नागरिक यांना पुष्पगुच्छ देऊन शासनाच्या अन्यायकारक धोरणापासून सावध राहण्याचे आवाहन करत पत्रके वाटून जनजागृती केली. यावेळी रफीक शेख, शैलेश बैस, राजीव चंदेल, राजू पावडे, बी.सी. बॅनर्जी यांच्यासह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण भागातही हे आंदोलन झाले.जिवतीत धरणे आंदोलनजिवती तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य गोदरू जुमनाके, निशिकांत सोनकांबळे, मारोती बेलारे, अश्फाक शेख, इस्माईल शेख आदी कार्यकर्ते सहभागी होते.सावली तालुक्यात काँग्रेसचे निवेदनचंद्रपूर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तालुका शाखा सावली यांच्यातर्फे महागाई विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवित सावलीच्या तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. सावली तालुका महासचिव उत्तम गेडाम यांच्या नेतृत्व सावलीच्या तहसीलदाराकडे निवेदन देण्यात आले. यावेळी बबन लोनबले, अरुण संदोकार, प्रेमप्रकाश बोरकर, विनायक गेडाम, आबाजी आवळे, अशोक वेटे, संजय गेडाम, प्रदीप सेमस्कार, विजय गोंगले, चंदू दुधे, ईश्वरदास दुधे यांची उपस्थिती होती.ब्रह्मपुरीत काँग्रेसचे निवेदनभाजपा सरकारने तीन वर्षांच्या काळात पेट्रोलची ६० रुपयांवरुन ८० रुपयांवर भाववाढ केली. तसेच डिझेल, गॅसवर वाढ व वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहिसलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय तुमाने, काशिनाथ खरकाटे, राकेश कºहाडे, गणी खान, नारायण बोकडे, प्रभाकर सेलोकर, संजय हटवार, बी.आर. पाटील, इनायत खा पठान, एच.एन. सिंग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.