शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंगविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम

By admin | Updated: January 19, 2016 00:36 IST

२६ जानेवारीनंतर महानगरपालिका क्षेत्रात लागणाऱ्या अवैध होर्डिंग बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, ...

२६ जानेवारीची मुदत : पक्ष पदाधिकारी व मुद्रक प्रिन्टर्स धारकांची बैठक चंद्रपूर : २६ जानेवारीनंतर महानगरपालिका क्षेत्रात लागणाऱ्या अवैध होर्डिंग बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मुद्रक व प्रिन्टर्स तसेच महानगरपालिका अधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्देश दिले. या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. विजय इंगोले, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मुद्रक प्रिन्टर्स उपस्थित होते.२६ नोव्हेंबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अवैध, होर्डिग, बॅनर व पोस्टर्स प्रसिध्द करणाऱ्या व्यक्तीवर, पक्षांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४, २४५ व मालमत्ता विद्रृपीकरण अधिनियम १९९५ अन्वये कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २६ जानेवारी नंतर शहरात लागणाऱ्या होर्डिग, बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे राजकीय पक्ष, मुद्रक व प्रिन्टर्स यांना बंधनकारक असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ठरवून दिलेल्या जागेवरच होर्डिंग लावावे महानगर पालिका क्षेत्रात जाहिरात लावण्यात येणाऱ्या ठिकाणाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या जागे व्यतिरीक्त होर्डिग, पोस्टर व बॅनर आढळून आल्यास संकेतस्थळावर नागरिकांनी तक्रार कराव्या, असे आवाहन या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले. मनपाची कारवाई केवळ फार्स शहरातील अवैध होर्डिंगच्या विरोधात चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने काही दिवसांपुर्वी कारवाई सुरू केली होती. मात्र ही कारवाई केवळ फार्स ठरली. सद्यास्थितीत जटपुरा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लागल्या आहेत. मात्र येथे होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.अवैध होर्डिंगमुळे प्रदूषणात वाढशहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग उभ्या आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. २६ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने ही कारवाई किती दिवस चालणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.