शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजनिधी संकलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

By admin | Updated: January 23, 2016 01:04 IST

ध्वजदिन निधी २०१४ च्या संकलनासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यास ३० लक्ष ८० हजार रूपये उदिष्ट दिले होते.

चंद्रपूर : ध्वजदिन निधी २०१४ च्या संकलनासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यास ३० लक्ष ८० हजार रूपये उदिष्ट दिले होते. यात जिल्ह्याने ३१ लक्ष ८५ हजार रूपयाचा निधी संकलीत केला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांचा गौरव प्रजासत्ताक दिनी केला जाणार आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह २६ जानेवारी रोजी आयोजित प्रजासत्ताक दिन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात गौरव करण्यात येणार आहे. लिमसे यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचा पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने स्वीकारणार आहेत. युध्द क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आत्मबलिदान करून वीरगती लाभलेल्या लष्करातील जवानांच्या कुटुंबियांना, अवलंबितांचे पुनर्वसन करण्यासाठी निधीची गरज पडते. तो ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडून गोळा केल्या जाते. या निधीचा संकलन शुभारंभ दरवर्षी ७ डिसेंबर रोजी केला जातो. युध्दक्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहिद झालेले, अपंगत्व प्राप्त झालेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी महाराष्ट्र शासन या निधीतून विविध कल्याणकारी योजना राबवित असते. (स्थानिक प्रतिनिधी)