शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण

By admin | Updated: May 7, 2016 01:26 IST

वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : पॉवर ग्रीड कंपनीचा सी.एस.आर. निधीचंद्रपूर: वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची एक दिवसीय बाल आकार नामक प्रशिक्षण कार्यशाळा १७ आॅक्टोबर २०५१ ला घेण्यात आली होती. तसेच २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातसुध्दा राज्यातील १० हजार अंगणवाड्या आदर्श व स्मार्ट म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील १०० अंगणवाडी सेविका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशदा पुणेद्वारे घेण्यात आले.ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने पॉवर ग्रीड या कंपनीच्या सी.एस.आर. निधीमधून दोन हजार अंगणवाडयांना रेडिओ व स्पिकर्स देण्याचे निश्चित करण्यात आले असून मे २०१६ च्या अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना सदर रेडीओ स्पिकर्सचे वितरण करण्यात येईल. चंद्रपूर आकाशवाणीच्या माध्यमातून प्रत्येक आठवडयात एक ते दोन तासांच्या कालावधीत अंगणवाडीतील बालकांसाठी, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी यशदा पुणे येथील तज्ज्ञ तसेच राज्यातील इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेण्यात येईल.ना. सुधीर मुनगंटीवार हे प्रथमत: सर्व अंगणवाडी सेविकांना आकाशवाणीद्वारे संबोधित करतील. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ० ते ५ वयोगटातील बालकांवर योग्य संस्कार करणे व त्यांची आरोग्यविषयक देखभाल करणे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)