शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सौर कंदिलाचे वाटप

By admin | Updated: July 10, 2014 23:31 IST

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर अपंग, विशेष घटक योजना व महिला लाभार्थ्यांना नुकतेच सौर कंदिलाचे वाटप मोठा गाजावाजा करून करण्यात आले.

कोठारी : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर अपंग, विशेष घटक योजना व महिला लाभार्थ्यांना नुकतेच सौर कंदिलाचे वाटप मोठा गाजावाजा करून करण्यात आले. मात्र त्यातील अर्धे अधिक कंदिल नादुरुस्त असल्याने गरिबांच्या घरातील प्रकाश कायम अंधारमय झाला आहे. या योजनेत महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.जिल्हा परिषदेतील महिला बाल कल्याण विभागाकडून पंचायत समितीतून सौर कंदिलासाठी अपंग, विशेष घटक योजना व महिलांकडून अर्ज मागविले होते. अर्ज मंजूर करून पंचायत समितीत महिलांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. आपल्या घरी असलेला अंधार सौर कंदिलाद्वारे दूर होऊन घर प्रकाशमय होण्याच्या आनंदात कंदिल घरी नेण्यात आले. रात्र होताच कंदिल लावण्याचा प्रयत्न केला असता कंदिलातून प्रकाश येत नव्हता. अधिकाऱ्यांनी वाटप करताना कंदिल सुरू करण्याबाबत सुचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र मुळात कंदिल नादुरुस्त व निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातून प्रकाशच येईना. सदर बाब संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. मात्र कंदिलाचा पुरवठा जिल्हा परिषदेने केल्याचे सांगून हात वर केले. सौर कंदिलाचा पुरवठा जि.प. ने केल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे. कंदिलाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून कमी किंमतीचे निकृष्ठ दर्जाचे, नादुरूस्त कंदिलाचा पुरवठा करण्यात आला. वाटप करताना कंदिलाची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे घर प्रकाशमय करण्याच्या महिलांच्या आनंदावर विरजन पडले आहे. या कामात अधिकारी व कंत्राटदाराची कमीशनसाठी मिलीजुली असल्याचा संशय महिलांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या गरीबांच्या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. आता या कंदिलाची दुरूस्ती होणार किंवा नादुरूस्त कंदिल परत बोलावून त्यांना नवीन कंदिल देण्यात येतील काय, असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.शासनाने गरीब महिलांना सौर कंदिलाचे वाटप केले. मात्र नादुरूस्त कंदिलाच्या वाटपाने या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बल्लारपूर पंचायत समितीत १४४ कंदिलाचे वाटप केले. मात्र त्यातील अर्धे कंदिल नादुरुस्त आहेत. सदर प्रकार सर्वच पंचायत समितीत असल्याचे समजते. त्यामुळे या कंदिल खरेदीत मोठा घोळ झाल्याचे समजते. नादुरुस्त कंदिल पुरविणाऱ्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. (वार्ताहर)