शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

निराधार विधवांना मदतीच्या धनादेशाचे वितरण

By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST

बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे तालुक्यातील १० महिलांच्या अर्जाला मंजुरी प्राप्त झाली.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : १० महिलांना प्रत्येकी २० हजारांचा धनादेशबल्लारपूर: बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे तालुक्यातील १० महिलांच्या अर्जाला मंजुरी प्राप्त झाली. १० विधवा महिलांना प्रत्येकी २० हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण शुक्रवारला उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, नायब तहसीलदार पी. डी. वंजारी, लिपीक सुनिल दडमल, दीपिका कोल्हे यांची उपस्थिती होती.यावेळी बामणी (दुधोली) येथील रजनी रविंद्र गावंडे, कोठारी येथील कलावती बंडू कुर्रेवार, सुषमा सुनिल गोंधळी, कवडजई येथील रेखा अनिल चिचघरे, बल्लारपूर येथील मंगला संजय लभाने, रंजना सुनिल मंगर, शिल्पा शैलेश चव्हाण, सुशिला दादाजी निमसरकर, हेमलता सुरेंद्र बहुरिया यांच्या पतीचे अकाली निधन झाले. यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. अशांना शासनाच्या कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या प्रकरणाला तहसीलदार डी. एस. भोयर यांनी तातडीने मंजुरी दिली. शासनाकडून गरीब व दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या हस्ते प्रदान करुन दिलासा देण्यात आला. यावेळी त्यांनी धनादेश बँक खात्यात जमा करुन योग्य ठिकाणी खर्च करुन कुटुंबाला आधार द्यावा, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)