शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सरडपारवासी विकास योजनांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:59 IST

तालुक्यातील सरडपार येथे शासनाच्या विविध योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देएसडीला निवेदन : निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील सरडपार येथे शासनाच्या विविध योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.सरडपाड येथील नागरिकांना स्वच्छतागृह व घरकूल योजनेचा लाभ मिळाला नाही. पात्र लाभार्थी वंचित आहेत. मागील चार वर्षांपासून विकास योजना न आल्याने कामे ठप्प झाली. चिमूर ग्रामपंचायतचे रूपांतर सन २०१५ ला नगर परिषद मध्ये करण्यात आले. त्यावेळी काग गट ग्रामपंचायतचे विलीनीकरण नगर परिषदमध्ये झाले. मात्र त्यावेळी गट ग्रा. पं. अंतर्गत असलेल्या सरडपार गावाला म्हसली ग्रामपंचायतला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आले मात्र सदर गावांची कोणतीही माहिती आजपर्यंत आॅनलाईन झाली नाही. परिणामी, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरडपार गावाची लोकसंख्या सुमारे ५५० आहे.सरडपारला तात्पुरता स्वरूपात ग्रामपंचायत म्हसलीला जोडण्यात आले. पण उपयोग झाला नाही. शासनस्तरावरून आॅनलाईन न झाल्याने आॅनलाईन माध्यमातून मिळणाºया शासकीय योजना, जन्म दाखले, कर आकारणी, जॉब कार्ड आणि इतर सर्व कागदपत्रे मिळणे बंद झाले. गावकºयांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. योजनांसाठी पात्र असूनही आर्थिक व सामाजिक विकास करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.यावर तातडीने तोडगा काढून योजनांचा लाभ मिळवून दिला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांच्याकडे निवेदनातुन देण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेता सतीश वारजूकर, पंचायत समितीचे गटनेता रोशन ढोक, पं. स. सदस्य लता पिसे, अरूण पिसे, सामाजिक कार्यकर्ता सुधीर जुमडे, रवींद्र सहारे, बालाजी मेश्राम, अक्षय श्रीरामे, पवन सहारे, आकाश खडके, वासुदेव गुडधे, सोमेश्वर रंधये, उत्तम धारणे, विनोद वाकडे, दयाराम कुंभरे, प्रमोद वाकडे, भगवान शेंडे व सरडपार येथील बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.