शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतील व्हॉल्वच्या टाक्यात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 12, 2015 01:17 IST

इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे.

पाणी दूषित: अनेक दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्षदुर्गापूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे. यात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. धरणातून पाणी आणण्यासाठी तुकूमस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यावर ठिकठिकणी एअर व्हॉल्व्ह शिवाय मुख्य व्हॉल्व बसविले आहेत. त्या सभोवताल सिमेंट क्राँक्रीटच्या टाक्याचे बांधकाम करण्यात आले आहे. असाच एक व्हॉल्व चंद्रपूर-ताडोबा मार्गावर वीज केंद्राच्या मेजर गेट पुढे आहे. याचे बांधकाम करण्यात आले. तेव्हा टाके बंद अवस्थेत होते. मात्र सध्या हे टाके उघड्यावर पडले आहे. यावरील झाकण चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे या टाक्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात राहणारे नागरिक, व्यावसायिक कचराकुंडीसारखे याच व्हॉल्वमध्ये केरकचरा फेकत आहेत. या टाक्यातील घाण पाणी व्हॉल्वद्वारे जलवाहिनीत शिरुन पाणी दूषित होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)