शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मशाळेचा वाद पोलीस ठाण्यात

By admin | Updated: September 21, 2015 00:44 IST

राजुरा शहरातील भारत चौकात शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे.

राजुरा : राजुरा शहरातील भारत चौकात शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा जीर्ण अवस्थेत असुन त्याला पाडण्याची परवानगी मागितली. या धर्मशाळेची नगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे. मात्र ही मालमत्ता वक्फ बोर्डची असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे भारत चौकातील धर्मशाळेचा वाद राजुरा पोलीस ठाण्यात पोहचला. यादरम्यान, राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांनी दोन्ही धर्माच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत दोन तास चर्चा केली. या चर्चेत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात या धर्मशाळेची कागदपत्रे नगर पालिका रेकॉर्डला असल्यामुळे जीर्ण धर्मशाळा पाडण्यात यावी, त्याचे साहित्य त्याच जागेवर एका ठिकाणी ठेवण्यात यावेत. या धर्मशाळेचा जो बोर्ड आहे, तो तसाच ठेवण्यात यावा. वक्फ बोर्ड जर न्यायालयात गेले. नगर पालिकेला त्याची प्रत दिल्यानंतर नगर पालिकेने हा धर्मशाळेचा बोर्ड काढुन त्या ठिकाणी नगरपालिकेचा बोर्ड लावण्यात यावा. त्यामध्ये मालमत्ता क्रमांक टाकून वाद न्यायालयात मिटेपर्यंत या ठिकाणी कुणीही बांधकाम करू नये. जो कोणी या अटीचा भंग करेल, तो कारवाईस पात्र राहील असे ठरविण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक स्वामी येरोलवार, शरिफ सिद्दीकी, सय्यद सखावत अली, सुभाष रामगिरवार, बाब बेग, राजु डोहे, सोमेश्वर आईटलावार, राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाक उपस्थित होते. शंभर वर्षापुर्वीची धर्मशाळा जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पोलीस आणि राजुरा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पाडण्यात आली.राजुरा शहरात गणेश उत्सव सुरू असुन राजुरा शहरात रविवारी दुपारी धर्मशाळेचा वाद निर्माण झाला होता. परंतु राजुरा येथील ठाणेदारांनी योग्यरितीने हाताळून वाद सद्या तरी मिटविण्यात यश मिळविले आहे. (शहर प्रतिनिधी)