व्यसनमुक्ती कार्यक्रम : ग्रामस्वच्छता सप्ताह अभियानाचा समारोपचंद्रपूर : गावांचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर ग्रामस्वच्छतेच्या कार्याची नितांत गरज आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळांनी फक्त भजनापुरतेच काम करून चालणार नाही. गावाच्या विकासात आपले भरीव योगदान दिले पाहिजे. राष्ट्रसंताच्या विचाराने विठ्ठलवाड्यासह इतर गावांचा विकास साधता येईल, असे प्रतिपादन ग्रामगीता तालुकाप्रमुख व १५ व्या राष्ट्रसंत विचार साहित्य कृती संमेलनाचे समन्वयक सूरज गोरंतवार यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा विठ्ठलवाडा यांच्या वतीने आयोजित ग्रामस्वच्छता सप्ताह अभियान समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. उद्घाटक प्रतिष्ठित नागरिक व्यंकटेश मल्लेलवार व सहउद्घाटक सरपंच मधुकर लखमापुरे होते. प्रमुख अतिथी प्रचारक मारोतराव साव, उपसरपंच गिरिधर दिवसे, मंदिर कमेटी अध्यक्ष गजानन कुंदोजवार, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, तंटामुक्ती अध्यक्ष टिकाराम डाहुले, नारायण वागदरकर, नितीन काकडे, कालीदास अवतरे, शंकर आमने, बाबुराव ताजणे, मंदा कुंदोजवार, वर्षा वाग्दरकर आदी उपस्थित होते.यावेळी मारोतराव साव यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले. व्यसनानी घराची राखरांगोळी होते. अनेकांना हे व्यसन कसे जीवघेणी ठरते व कुटुंब कसे दुभंगत जाते, याबाबत त्यांनी उपस्थितांसमोर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष कमल लोणारे, सचिव सुष्मा वाडगुरे, उपाध्यक्ष भगीरथ गायकवाड, रामचंद्र पिंपळकर, मोरेश्वर लडके, ओमाजी पिंपळकर, विलास लोणारे, बंडू सिडाम, नारायण कोवे, वारलू ताजने, मारोती मोहूर्ले, कुकसू कुत्तरमारे, रवि ताजने, महादेव कष्टी, मनोज पोतराजे, सिंधू नेवारे आदींनी परिश्रम घेतले. संचालन व प्रास्ताविक संजय वाग्दरकर यांनी केले. कार्यक्रमापूर्वी सामुदायिक पार्थना घेण्यात आली. यावेळी स्वर्गवासी सखुबाई पिंपळकर यांना मौन श्रद्धांजली देण्यात आली. (प्रतिनिधी)
राष्ट्रसंतांच्या विचारानेच गावांचा विकास शक्य!
By admin | Updated: February 22, 2017 00:49 IST