शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना

By admin | Updated: May 7, 2016 01:23 IST

वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या.

नागरिकांत संताप : वेकोलिच्या अधिकाऱ्यांचा प्रतापघुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या. त्या समस्याचे निवारण करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने वेकोलि अधिकारी, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मात्र संबंधितांनी वेळकाढु धोरण स्वीकारले. परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. कोळसा उत्खननासाठी वापरण्यात येणारी ‘ड्रगलँड’ हे यंत्र वर्धा नदी पार करून मुंगोलीकडे आगेकूच करत असल्याचे कळताच, मुंगोली व नजिकच्या गावातील लोकांनी विरोध करीत रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुंगोली गावाचे पुनर्वसन, गाव, खाण परिसराला लागून असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे, त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासोबतच गावकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. ग्रामपंचायतीकडून वेकोलि व जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. पाठपुरावा करण्यात आला. आंदोलने करण्यात आलीत. आंदोलनादरम्यान वेकोलि, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठका झाल्यात. समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आलेत. प्रत्यक्षात समस्या सुटल्या नाहीत. वेकोलि वणी क्षेत्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस खुल्या कोळसा खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा उत्खननात महत्वाची भूमिका बजावणारी ‘ड्रगलँड’ नावाची मशिन यवतमाळ जिल्ह्यातील मुंगोली खुल्या कोळसा खाणीत नेण्याचा निर्णय वेकोलिने घेतला. तेव्हापासून गावकऱ्यांकडून याला विरोध केल्या जात असला तरी त्याकडे वेकोलि व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात वेकोलि, जिल्हा प्रशासनाला मुंगोलीसह विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आंदोलनाची भूमिका कळविली होती. १ मेपासून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र वेकोलि अधिकारी वा प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेत नाही. दरम्यान, वेकोलिने लोकभावनांकडे दुर्लक्ष करीत चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी पार करून यवतमाळ जिल्हातील मुंगोली खाणीकडे ‘ड्रगलँड’ नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुंगोली येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)