शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना

By admin | Updated: May 7, 2016 01:25 IST

वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या.

घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या. त्या समस्याचे निवारण करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने वेकोलि अधिकारी, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मात्र संबंधितांनी वेळकाढु धोरण स्वीकारले. परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. कोळसा उत्खननासाठी वापरण्यात येणारी ‘ड्रगलँड’ हे यंत्र वर्धा नदी पार करून मुंगोलीकडे आगेकूच करत असल्याचे कळताच, मुंगोली व नजिकच्या गावातील लोकांनी विरोध करीत रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुंगोली गावाचे पुनर्वसन, गाव, खाण परिसराला लागून असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे, त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासोबतच गावकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. ग्रामपंचायतीकडून वेकोलि व जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. पाठपुरावा करण्यात आला. आंदोलने करण्यात आलीत. आंदोलनादरम्यान वेकोलि, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठका झाल्यात. समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आलेत. प्रत्यक्षात समस्या सुटल्या नाहीत. वेकोलि वणी क्षेत्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस खुल्या कोळसा खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा उत्खननात महत्वाची भूमिका बजावणारी ‘ड्रगलँड’ नावाची मशिन यवतमाळ जिल्ह्यातील मुंगोली खुल्या कोळसा खाणीत नेण्याचा निर्णय वेकोलिने घेतला. तेव्हापासून गावकऱ्यांकडून याला विरोध केल्या जात असला तरी त्याकडे वेकोलि व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात वेकोलि, जिल्हा प्रशासनाला मुंगोलीसह विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आंदोलनाची भूमिका कळविली होती. १ मेपासून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र वेकोलि अधिकारी वा प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेत नाही. दरम्यान, वेकोलिने लोकभावनांकडे दुर्लक्ष करीत चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी पार करून यवतमाळ जिल्हातील मुंगोली खाणीकडे ‘ड्रगलँड’ नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुंगोली येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)