शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विरूर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

By admin | Updated: September 15, 2015 01:22 IST

आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू,

विरुर (स्टे.) : आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली असून संपूर्ण परिसर तापाच्या विळख्यात सापडला आहे. चिंचाळा येथे आठ दिवसांत डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतामध्ये गावचे पाटील सित्रु मडावी (६०) यांचा समावेश आहे. तर भिमराव वेंकटी कुळमेथे (२२) रा. चिंचाळा याची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील चार गावे तापाच्या विळख्यात आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे बहुतांशी लोक शेतकरी, आदिवासी गरीब जनता वास्तव्यास आहे. मागील १५ दिवसांपासून परिसरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरल्याने गरीब रुग्ण खासगी रुग्णालयाचा आसरा घेत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आदिवासी गरीब जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. येथुन बारा कि.मी. अंतरावर चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आता चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे तापाची साथ पसरल्याने गावातील प्रत्येक घरी एक दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. आरोग्य विभाग थातुरमातुर उपचार करून रुग्णांना दिलासा देत आहे परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. गावकरी विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसुन येत आहे. चिंचाळा गावात गंगुबाई दौलत गेडाम, भिमराव वेंकटी सिडाम, गंगाधर परचाके, सखुबाई परचाके, देवराव गेडाम, हनुमंतु मडावी, शेखु मारोती मडावी यांच्यासह अनेक रुग्ण खाटेवर पडून आहे. तसेच भेंडाळा येथील मंगेश ढवस, दत्तु ढवस, दादाजी शेळमाके, अविनाश ढवस, छाया ढवस यांचेसह केळझर गावकरी हे तापाने फणफणत आहे.चिंचोली (बु.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने व कशामुळे झाला हे आता सांगणे कठीण आहे. सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. प्रत्येकांनी परिसर स्वच्छ ठेवावे व शुद्ध पाण्याचा वापर करावा. डासांचा प्रतिबंध करावा, कोरडा दिवस पाळावा, असे गावकऱ्यांना सांगितले. तसेच अबेड व अळीनाशक औषधांची फवारणी केली. रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.- डॉ. सुनील फुलझले, चिंचोली (बु), प्राथमिक आरोग्य केंद्र