शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक

By admin | Updated: September 4, 2014 23:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्दी, खोकला, मलेरियासारख्या रोगांच्या यापूर्वी साथी पसरल्या. मात्र काही दिवसांपासून डेंग्यूनेच उद्रेक सुरू केला आहे.

सेवा कोलमडली : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षेमुळे जाताहेत बळीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्दी, खोकला, मलेरियासारख्या रोगांच्या यापूर्वी साथी पसरल्या. मात्र काही दिवसांपासून डेंग्यूनेच उद्रेक सुरू केला आहे. अनेक गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे तर काही जणांचा यात बळीही गेला आहे.सास्ती- राजुरा तालुक्यातील चार्ली येथे माागील काही दिवसांपासून डेंग्यूसदृश्य तापाच्या साथीने संपूर्ण गावाला जखडले असून एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तापाने रुग्ण दगावाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याठिकाणी वैद्यकीय सेवाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यातील नदीपट्टयातील भागात तापाची साथ सुरू आहे. त्यात चार्ली येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून गावातील प्रत्येक घरात एक रुग्ण आढळून येत आहे. मोठ्या प्रमाणात साथ सुरू असूनही आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळेच येथील माया दत्तु बोढे (३०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावात असे अनेक रुग्ण असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या महिलेला दोन दिवसांपासून ताप येत होता. राजुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. तापामुळे महिलेचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन साथीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. या परिसरात कढोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही परिसरातील तापाच्या साथीवर आळा बसत नसल्याने येथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोके) व चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे डेंग्युच्या रुग्णात आणखी वाढ झालेली आहे. पेंढरी कोके येथील गजभिये वॉर्डात बरेच तर गोंदेडा येथील वैष्णवी नामदेवराव घोडाम (१२) हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे प्रथम चिमूर येथील डॉ. दिलीप शिवरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये व नंतर चंद्रपूर येथील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यात भरती केले आहे. परिसरातील बऱ्याच गावात डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू आहे. परंतु या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. अऱ्हेरनवरगाव येथे डेंग्यूची साथस्थानिक पिंपळगाव जि.प. क्षेत्रातील अनेक गावात सध्या मलेरिया डेंग्युसदृश्य तापाची साथ पसरली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ग्रामीण रुग्णालय हाऊसफूल्ल आहेत. अपुऱ्या खाटाअभावी रुग्णांना खालीच उपचार घ्यावा लागत आहे. अऱ्हेरनवरगावातील चार रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुरुषोत्तम पुंडलीक देवढगले (३०) या रुग्णाला नागपूर येथे दाखल केले आहे. गोलू बाबुराव राऊत (१९), विशाखा ज्ञानेश्वर देवढगले व (१४) किर्ती विशाल ठेंगरे (४) या रुग्णांवर ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (लोकमत चमू)