शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावरील कामगारांची वीरूगिरी

By admin | Updated: July 8, 2015 01:11 IST

तीन महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या पेट्रोलपंपावरील १५ कामगारांनी मंगळवारी न्यायासाठी चंद्रपुरात वीरूगिरी केली.

चंद्रपूर: तीन महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या पेट्रोलपंपावरील १५ कामगारांनी मंगळवारी न्यायासाठी चंद्रपुरात वीरूगिरी केली. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामागील बीएसएनएलच्या टॉवरवर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने या विषयात कोणतीही मदत करण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने कामगारांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर यांच्या आवाहनानंतर कामगार टॉवरखाली उतरले. हे आंदोलन तब्बल नऊ तास सुरू होते.चंद्रपूर शहरातील विविध पेट्रोलपंपावर कार्यरत कामगारांना नियमानुसार किमान वेतन व सर्व सुविधा देण्याची मागणी करणाऱ्या १८ कामगारांना पेट्रोलपंप संचालकांनी तीन महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. दरम्यान या कामगारांनी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. त्यानंतर चंद्रपूरचे सहाय्यक कामगार आयुक्त व नागपूर येथील कामगार आयुक्त यांच्यासोबत पेट्रोलपंप संचालक व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली. मात्र नंतर पेट्रोलपंप संचालकांनी कामगारांना कामावर घेण्यापूर्वी काही अटी टाकल्या. तसे लिहून देण्यासाठी कामगारांवर दबावही टाकला. मात्र कामगारांनी सदर अटी मान्य न करता न्यायासाठीची लढाई सुरूच ठेवली. दरम्यान, स्थानिक वासेकर व जयहिंद पेट्रोलपंपवरील कामगार वतन मेश्राम, गौतम जोगी, सचिन टिकले, अरविंद भागडकर, शंकर पोईनकर, रमेश वाढई, दीपक बेंदरे, मनीष पारशिवे, बंडू रामटेके, अरुण साव, प्रशांत रामटेके, राकेश धानोरकर, सचिन मंत्रीवार, नरेश काटोले हे मंगळवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयामागील बीएसएनएलच्या टॉवरवर चढले. या आंदोलनाची माहिती मिळताच, टॉवरखाली पोलीस तैनात करण्यात आले. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी आडे व तहसीलदार अरूण शिंदे यांना या समस्येतून मार्ग काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. त्यानुसार या अधिकाऱ्यांची कामगार नेत्या अ‍ॅड.हर्षल चिपळूणकर व कामगार प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. मात्र पेट्रोलपंपावर कार्यरत कामगारांना न्याय देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असे सांगून या अधिकाऱ्यांनी हात वर केले. त्यानंतर अ‍ॅड. चिपळूणकर यांच्या आवाहनावरून हे कामगार दुपारी टॉवरवरून खाली उतरले. (प्रतिनिधी)समस्येबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोपया आंदोलनानंतर अ‍ॅड.हर्षल चिपळूनकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गरीब कामगारांचा कुणी वाली नसून कामगार विभाग पेट्रोलपंप संचालकांच्या हिताचे रक्षण करण्यात गुंतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परिणामी कामगार संकटात सापडले असल्याचे त्या म्हणाल्या.