शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या सर्वेक्षणाची मागणी करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा- आत्राम

By admin | Updated: January 30, 2016 01:19 IST

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील १७ जमातीचे मानवशास्त्रीय संशोधनात्मक सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.

चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील १७ जमातीचे मानवशास्त्रीय संशोधनात्मक सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्या संबंधाने बोगस आदिवासी आणि खरे आदिवासी हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. मागासवर्गीयातील काही जातींनी परधान जमातीच्या सर्वेक्षणाची मागणी केलेली आहे. ती मागणी म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबाचाच प्रकार आहे, असे सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडिजिनस एम्प्लाईज मल्टीपरपज असोसिएशन चंद्रपूरचे महासचिव डी. पी. आत्राम यांनी म्हटले आहे.परधान जमात ही आदिवांसीची मूळ जमात आहे आणि भविष्यातसुद्धा राहणार आहे. बोगस आदिवासीनी परधान जमात ही आदिवासीची जमात नाही, असा कांगावा करीत आमच्यातील काही जमातीतील घरभेदी लोकांना हाताशी धरुन परधान जमातीला बोगस आदिवासी संबोधून आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत आहेत.कारण परधान जमातीनेच पहिल्यांदा बोगस आदिवासीच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करुन बोगस आदिवासीचे पितळ उघडे पाडले. त्यामुळेच हा सर्वेक्षणाचा फंडा जातीयवादी शक्तीने काही हिंदुत्ववादी लोकांना घेऊन रचलेले षडयंत्र असल्याचे आत्राम यांचे म्हणणे आहे. बोगस आदिवासी खऱ्या आदिवासींच्या सोयी सवलती लाटत होते. ते परधान जमातीने बंद केले. त्यामुळे परधान जमातीबद्दल बोगस आदिवासी आकस व्यक्त करीत आहेत. आदिवासींच्या सोयी सवलती लाटणाऱ्या बोगस आदिवासींच्या नोकऱ्या गेल्या. त्यांचे पोट भरण्याचे साधन गेले. त्यामुळे आदिवासी समाजाचे विरोधक, समाजकंटक, परधान जमातीवर बिनबुडाचे अवास्तव, खोटे, आरोप करीत आहेत.परधान जमात ही आदिवासीची मुळ जमात नाही. असा त्यांनी जावई शोध लावला आहे. आणि उठसुठ परधान जमातीवर आरोप करणे हा त्याचा धंदा आहे. असे आत्राम म्हणाले. आदिवासीमधील परधान, गोंड, कोलाम, माडीया, यांचे कुळ, देव, रीतीरिवाज, पंचायत संस्था, जाती संस्था, गोत्र हे एकच आहेत. तेही शासनाने विचारात घेऊन तपासावे, असे आवाहन त्यांनी केले.मिलिंद कटवारे यांच्या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाने कोष्टी ही जात बोगस आदिवासी आहे.त्यामुळे कोष्टी समाजातील काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचे आत्राम म्हणाले. (प्रतिनिधी)