शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:29 IST

सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. रुंदीकरण ...

सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित

सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र, याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे.

जिवती तालुक्यातील समस्या सोडवा

जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली, तरीही वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधाही येथे पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. या सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा

जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहतुकीसाठी त्रासदायक ठरलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावरील अंधार दूर करा

कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गांवर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्थानक, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका क्रीडा संकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.

राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी

जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. आता शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्र लागणार आहेत.

भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस

भद्रावती : काही गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे रानडुकरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूर-भोयगाव- कोरपना बसफेऱ्या वाढवा

कोरपना : चंद्रपूरवरून कोरपनासाठी ज्यादा फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी प्रवाशांकडून होत आहे. भोयगाव हा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे. नियमित प्रवासी जाणे-येणे करतात. मात्र, या मार्गावर अत्यल्प बसेस धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.