नंदू रणदिवे : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कमूल : कायदा व सुव्यवस्थेची भीती न बाळगता काही युवक सुसाट वेगाने वाहन चालवित आहे, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मूल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्याकडे केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा विकास होत आहे, मूल शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-नागपूर मार्गाचे करोडो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यासोबत मूल शहरातील काही अंतर्गत रस्तेही सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आलेले असून या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या काही युवकांकडून सुसाट वेगाने वाहन चालविल्या जात आहे. मूल शहरातील रस्त्याच्या मध्यभागी लाईट्स आणि वेगवेगळ्या फुलाचे झाडे लावण्यात आलेले आहे. याचा आनंद घेत शहरातील काही वृद्ध, महिला, पुरुष रात्रीच्या वेळेस फिरण्यासाठी निघतात, दरम्यान काही युवकांकडून रस्त्यावर सुसाट वेगाने वाहन चालविण्याची स्पर्धा लावली जाते, अशातच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मूल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्याकडे केली आहे. यावेळी राकेश ठाकरे, सुरेश फुलझेले, मार्कंड कापगते, सुधीर धर्मपुरीवार तसेच शहरातील नागरिकांची उपस्थित होते.
वाहने सुसाट चालविणाऱ्यांना लगाम घालण्याची मागणी
By admin | Updated: July 9, 2017 00:43 IST