शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहरातील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST

शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

चंद्रपूर : शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.चंद्रपूर शहरातील प्रमुख महाविद्यालय, हॉस्पीटल, शासकीय तसेच खासगी कार्यालय असलेल्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून नागपूर, बल्लारपूर, मूल, सीटीपीएसकडे जाणारी जडवाहतूक दिवसरात्रं सुरू असल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. अपघातात युवक, युवती, शाळकरी मुला, मुलींचे नाहक बळी जात आहेत. आतापर्यंत या मार्गावर ५०० पेक्षा अधिक नागरिकांचे जडवाहतुकीमुळे मृत्यू झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी नागरिकांमध्ये जडवाहतुकीच्याविरोधात संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भावनांची दखल घेत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेक आंदोलन केली आहे. पोलीस प्रशासन जडवाहतुकीमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यबाबत गंभीर नसल्याने आतापर्यंत शासकीय नियमानुसार जडवाहतुकी विरोधात कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. जडवाहतुकीमुळे चंद्रपुरतील जनतेचा नाहक बळी जात आहे. वरोरा नाका उडाणपुलाच्या बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपुरातील नागपूर रोड, बंगाली कॅम्प, तुकूम रोडवर महाविद्यालय, शाळा, हॉस्पीटल, हॉटेल, शासकीय, खाजगी कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठान असल्याने रस्त्यावर अत्यंत वर्दळ असते. यात महाविद्यालयीन, शाळेतील तरुण, तरुणी, लहान मुल, मुलींचा समावेश आहे. नागपूर, बल्लारपूर, मूल, सिटीपीेस मार्गाने धावणाऱ्या जडवाहतूक तरुण, शाळकरी मुल, मुलींचा अपघातात बळी घेत आहे. नियमाचे उल्लंघन करून जडवाहतूक सर्रासपणे सुरू आहे. जडवाहतुकीवर ठोस कारवाई केली जात नाही. जडवाहतूकीच्या विरोधात थातूरमातूर कारवाई करून पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याचे भासवित आहे. कडक कारवाईचा धाक नसल्याने येथील ट्रान्सपोर्ट मालक निर्ढावले आहेत. अपघाती मृत्यू ही एक मोठी गंभीर समस्या चंद्रपूर शहरवासियांची झाली आहे. अपघाताच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आतापर्यंत अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. चंद्रपूर शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याने जडवाहतुकीस कायमस्वरूपी बंद केल्यास अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन अपघाती मृत्यूबाबत गंभीर नाही, ही बाब चंद्रपुरकरांसाठी अतिशय दुर्दैवाची आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने जडवाहतूक विरोधात कडक पावले उचलावी, वर्दळीच्या मार्गावरील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मनसच्यावतीने करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)