शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बँक सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: July 3, 2015 01:23 IST

देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली.

शाखा अचानक बंद : नागरिकांना सोसावा लागते आर्थिक भुर्दंडदेवाडा : देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली. परिणामी नागरिकांना व्यवहार करण्यासाठी देवाडा परिसरातील २५ गावातील नागरिकांना २५ ते ३० कि.मी. राजुरा येथे जावे लागत आहे. यात नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.या आदिवासी दुर्गम भागात देवाडा हे मोठे गाव असल्यामुळे २५ गावे देवाडा या गावाच्या संपर्कात आहेत. रविवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार व्यवस्थित सुरू आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे कोणत्याही लहान मोठे कामानिमित्त राजुरा येथे जावे लागते. महिला बचतगट यांना दरमहा रक्कम उचल करणे व भरण्यासाठी व कर्ज घेण्यासाठी दरवर्षी बँकेत जावे लागते. तसेच शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कर्ज घेणे यासाठी बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी इंदिरा गांधी योजनांचा लाभ घेणे, अपंग व वायोवृद्ध नागरिकांना बँकेतून रक्कम घेण्याकरिता २५ ते ३० कि.मी. तुडवत जावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.शासनाच्या जीआरनुसार आॅनलाईन पद्धत झाल्यामुळे जनधन योजना असो किंवा शौचालयाचे बांधकाम झालेली रक्कम किंवा तेंदुपत्ता रक्कम अशा कोणत्याही योजना असो बँकेत नागरिकांना आपले सेविंग खाते लिंकीग करावे लागते. यासाठीआपले महत्त्वाचे कार्य सोडून राजुराकडे धाव घ्यावी लागते. देवाडा सर्कलमध्ये ७० टक्के शेतकरी असून त्यांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बँकेच्या कामासाठी गेले की, त्यांचा दिवस व्यर्थ जातो. एका फेरीत काम झाले तर ठिक अन्यथा परत दुसऱ्या दिवशी पुन्हा राजुऱ्यात जावे लागते. त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)