शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी तालुक्यातील मनरेगा कामाची चौकशी करण्याची मागणी

By admin | Updated: July 13, 2015 01:12 IST

पिंपळगाव (भो) येथील मनरेगा कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे उघडकीस येऊन लाखो रुपयाची अफरातफर ....

कामात गैरव्यवहार : मजुरांना कामच नाहीब्रह्मपुरी : पिंपळगाव (भो) येथील मनरेगा कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे उघडकीस येऊन लाखो रुपयाची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यात झालेल्या मनरेगा कामाची चौकशी केल्यास कोट्यावधींचे घबाड बाहेर येऊ शकतो. यातून मजुरांना भविष्यात न्याय मिळू शकतो. त्यामुळे मनरेगा कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शासनाने मजूरांच्या हाताला काम मिळावे म्हणून मनरेगा सारखी योजना सुरू केली. मजुरांना काम मिळाले, परंतु त्या कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे मजुरांच्या तक्रारी आहेत. योजनेचा थेट लाभ त्या मजुरांना मिळावे म्हणून आॅनलाइन, पासबुकाच्या माध्यमातून कामाचा मोबदला जमा करण्याची पद्धती अवलंबविले असतानाही इच्छा तेथे मार्ग याप्रमाणे भ्रष्टाचार केला जात आहे. पिंपळगाव (भो) येथे चक्क ग्राम रोजगाराचे नाव मस्टरमध्ये समाविष्ठ झाल्याने या योजनेत पुन्हा काय होऊ शकत नाही, याचा पुरावाच दिल्या गेला आहे. ग्रामीण भागातील जनता गावच्याच व्यक्तीवर भरवसा ठेवून काम करतात. परंतु, तोच त्यांचा आर्थिक घात करतो, हे या प्रकरणावरुन उघडकिस आले आहे. पिंपळगाव(भो) हे गाव याला एकमेव अपवाद नाही तर अनेक गावखेड्यात यापेक्षाही मोठा भ्रष्टाचार या रोहयो अंतर्गत झाला असेल, अशी शंका वर्तविली जात आहे. गरजूंना कामावर घेतल्या जात नाही, कारण तो आपल्या मर्जीतला नसल्याने डावलल्या जातो व त्याच्याऐवजी बोगस नावे टाकून पैसा लाटल्या जात असल्याने या योजनेला अधिकाऱ्यापासून ते लहान कर्मचाऱ्यापर्यंत भ्रष्टाचाराची मोठी किड लागली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामावर न घेतलेल्या मजुराने तक्रार केल्यास त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)