शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

धान्यसाठ्यात वाढ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणारा धान्यसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाना बाहेरुन दुकानातून धान्याची खरेदी करावी ...

चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणारा धान्यसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाना बाहेरुन दुकानातून धान्याची खरेदी करावी लागत असल्याने लूट होत आहे.

पथदिव्यांची दुरूस्ती करावी

चंद्रपूर : बालाजी वाॅर्ड, एकाेरी, समाधी वाॅर्डामध्ये काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे रात्री बाहेर निघणे कठीण झाले आहे.

त्या साहित्यामुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे हे साहित्य उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

जुन्या इमारतींसाठी निधीची गरज

चंद्रपूर : शहरातील शासकीय जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्याची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही इमारती अतिशय जुन्या असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.

अन्नपदार्थांची उघडयावर विक्री सुरूच

चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाचा विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे.

कामाअभावी बेरोजगार संस्था अडचणीत

चंद्रपूर: बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी बेरोजगार संस्थाची निर्मिती करण्यात आली. मात्र या संस्थांना कामच मिळत नाही. शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र या संस्थाना अद्यापही पाहिजे तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संस्थाचालक अडचणीत आहेत.

शहरातील फूटपाथवर अनेकांचे अतिक्रमण

चंद्रपूर : पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या चालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फूटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग व तुकूम परिसरात मार्गावर असलेल्या फूटपाथवर काही व्यावसायिक आपले वाहने पार्क करतात. एवढेच नाही तर साहित्य ठेवतात. त्यामुळे फूटपाथवरून चालणे अवघड झाले आहे.

नेटवर्कअभावी ग्राहकांची डोकेदुखी

चंद्रपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात विविध मोबाईले टॉवर संख्या कमीच आहे. त्यामुळे भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून कव्हरेजची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्याच्या ठिकाणी तरी टॉवरची निर्मिती करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध वॉर्ड व मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. दरम्यान, शहरात बरेच नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

नाम फलक नसल्याने प्रवाशी संभ्रमात

चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

गंजवाॅर्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी

चंद्रपूर : येथील गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. आता काही दिवसातच महाविद्यालय सुरु होणार असून या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र दुर्गधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.

वीज बिलाची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : शहरातील काही भागातील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या बिलांमध्ये अनेक त्रुट्या असल्याने ग्राहक वैतागले आहेत. विजेचे जादा बिल तर, त्याच परिसरातील काही ग्राहकांना चुकीच्या नावाने बिल देण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

बाबुपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे

चंद्रपूर : स्थानिक बाबुपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक घरात स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरात डेग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.