शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रदूषण भत्ता लागू करण्याची मागणी

By admin | Updated: January 22, 2015 00:49 IST

चंद्रपूर हा राज्यातील सर्वाधिक प्रदूषण असलेला जिल्हा आहे. नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होत आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर हा राज्यातील सर्वाधिक प्रदूषण असलेला जिल्हा आहे. नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होत आहे. यासाठी जिल्ह्यात प्रदूषण भत्ता व नक्षलग्रस्त भत्ता १५ तालुक्यांना लागु करावा व केंद्र शासनाने लागु केलेला ७ टक्के महागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना लागु करावा या मागण्यांसाठी विविध संघटनांच्या कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोेलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित समर्थन व सहभाग दर्शविला.जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया पूर्णपणे बंद झाल्या नाही. छुप्या नक्षलचळवळींचा जोर अद्याप ओसरला नसताना तसेच जिल्ह्यातील नक्षलसेलही बंद झाला नसताना अचानक नक्षलग्रस्त भत्ता मात्र बंद करण्यात आला. यामुळे पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे हा भत्ता जिल्ह्यातील १५ ही तालुक्यांना तत्काळ लागु करण्यात यावा, तसेच प्रदूषणामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा विचार शासनाने करावा व ज्या जिल्ह्यातून कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, त्यापैकी काही निधी जिल्ह्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर प्रदूषण भत्ता लागु करण्यात यावा, या प्रमुख मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध १८ संघटनांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी कुलसंगे यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, जगदीश जुनघरी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नरेंद्र बोबडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण समितीचे विजय भोगेकर, दीपक वऱ्हेकर, नारायण कांबळे, हरिश ससनकर यांनी केले. या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)