शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे

मूल : अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे पीक घटले असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. यासाठी संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मूल तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तहसिलदार मूलच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.धान उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन व कापूस लागवडी करणारा शेतकरी यावर्षीच्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे पुर्णत: खचला आहे. वर्षभर राबराब राबून व हजारो रुपये खर्च करून देखील खर्च केलेली रक्कम निघणे कठीण झाल्याची स्थितीत मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिच परिस्थिती असून सन १९७२ पेक्षाही भयंकर स्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ही शासनाची काळाची गरज आहे. यासाठी सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी तर कापसाला सहा हजार रुपये रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच ओलिताच्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तर ओलीत व फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, कापूस सहा हजार, सोयाबीन पाच हजार व धानाला चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करण्याची मागणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष रावत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, संजय मारकवार, विजय चिमड्यालवार आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते. शासानाने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले. हिवाळी अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनादरम्यान मदतीची घोषणा करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)