जिल्ह्यातील औधोगिक क्षेत्र असल्याने कामगारांची संख्या अधिक आहे. सर्व उद्योग सुरू आहे. अधिकतर कामगार कोरोनाबाधित आढळून येत आहे. सद्य:स्थितीत दररोज कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या सपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. ४५ वरील व्यक्तींचे लसीकरण होत आहे. येथे सर्वांत मोठे प्राथमिक केंद्र असून आठ उपकेंद्रे आहेत. त्या उपकेंद्रांवर लसीकरण केंद्र दिले. मात्र, घुग्घुस गावाच्या लोकसंख्येसाठी वेकोलीचे एकमात्र वणी क्षेत्राचे राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात लसीकरण केंद्र दिले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे तर आता दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांची पायपीट होत आहे.
घुग्घुस गावात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र देऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी सत्यनारायण डकरे यांनी केली आहे.