शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिने अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी

By admin | Updated: May 7, 2016 01:30 IST

भटाळी खुल्या खाणीच्या विस्तारीत खाणीकरिता भटाळी, किटाळी, कवठी, तिरवंजा, पायली या गावातील शेतकऱ्यांची जमीन वेकोलिने अधिग्रहीत केली आहे.

भद्रावती : भटाळी खुल्या खाणीच्या विस्तारीत खाणीकरिता भटाळी, किटाळी, कवठी, तिरवंजा, पायली या गावातील शेतकऱ्यांची जमीन वेकोलिने अधिग्रहीत केली आहे. मात्र मोबदला देण्यास दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.१३ मार्च रोजी भटाळी येथे जमिनीचे धनादेश शेतकऱ्यांना वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांचे धनादेश व लाभार्थ्यांना नोकरी एक महिन्याचे आत देण्याचे आश्वासन दिले. मात्र अनेक दिवस लोटूनही सर्व शेतकऱ्यांना धनादेश वाटप झाले नाही. तसेच नोकरीसंबंधात कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही.शेतकरी व बळीराज संघटनेच्या माध्यमातून नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे घाईगर्दीने वेकोलिने १३ मार्च रोजी धनादेश वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र अनेकांना मोबदला मिळाला नाहे. या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या संबंधातील व ज्यांनी आर्थिक व्यवहारातून संबंध जुळविले त्या शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहे. एका कुटुंबातील तीन ते चार धनादेश एकाच वेळी देण्यात आले. परंतु, गरीब व ज्यांचा कुणी वाली नाही, अशा शेतकऱ्यांचे धनादेश अध्यापही दिलेले नाही. कार्यक्रमात रायकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पुढील व्यवहार केले. काही मुलामुलींचे लग्न जुळविले, शेत विकत घेण्याचा सौदा करणे इत्यादी कार्य केले. परंतु, आश्वासन खोटे ठरल्याने शेतकऱ्यांनी केलेला व्यवहार खोटा ठरत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे धनादेश कोणताही भेदभाव न करता तातडीने देण्यात यावे. शेतकऱ्यांचे धनादेश वाटपात भेदभावाप्रमाणे नोकरी देण्यात भेदभाव होऊ नये, ज्या लाभार्थ्याचे वय जास्त आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी बळीराजा आता जागा हो संघटनेने केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)