शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: January 21, 2016 01:15 IST

मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती.

चिमूर : मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व चिमूर तालुका दुषकाळग्रस्त घोषित कण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू देवतळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.शेतकरी अत्यंत डबघाईत आला असून सन २०१५-१६ च्या शेती हंगामात पाऊस अपुरा पडल्याने धान्याची उत्पन्न कमी प्रमाणात झाले. लागवडी खर्च जास्त तर उत्पन्न कमी झाले. तसेच बाजारात कापूस, धान, सोयाबिन मालास भाव नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करु शकत नाही. सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांशी कैवारीची भाषा बोलत असणारे मात्र विसर पडला आहे. चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष राजू देवतळे, शहर अध्यक्ष राजू हिंगणकर, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, नगरसेवक विनोद ठाकूरकर, कदीर शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकर, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधव बिरजे, उपाध्यक्ष प्रकाश बोकारे, संजय डोंगरे, देवानंद गावंडे, बाळकृष्ण बोभाटे, अरविंद रेवतकर, धनराज मालके, दादा दहीकर, अविनाश अगडे, आशिष उमरे, राकेश साटोणे, अरविंद रेवतकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)