शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन ...

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कठड्यांअभावी अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही नद्यांच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.

वेगवान वाहनांवर कारवाई करा

चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यात्रा स्थळांना सुविधेचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते; मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक यात्रा स्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

लिलावाअभावी वाहने धूळ खात

चंद्रपूर : येथील रामनगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ खात आहेत. काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअरपार्टही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे. यामुळे पोलीस स्टेशन परिसरातील जागा मोकळी होईल.

बचत गटांना प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे; मात्र अद्यापही काही बचतगटांना प्रशिक्षण मिळाले नसल्याने त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.

वस्त्यांमधील बागेकडे मनपाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमध्ये प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : शहरातील अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता करून फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांच्या रक्षणासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.