जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ६५ हजार ३८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४७ हजार २१७ झाली आहे. सध्या १६ हजार ८२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ३ लाख ९१ हजार ८३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख २१ हजार ६४३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९९८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ९२५ तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २९, यवतमाळ २९, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे व सुरक्षित अंतर राखावे. नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
चंद्रपुरातील गजानन महाराज चौक परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, पठाणपुरा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, गांधी चौक येथील ८५ वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, ४७, ५० व ६२ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, वरोरा अभ्यंकर वॉर्डातील ५५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, भद्रावती गुरूनगर येथील ५४ वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील ४२ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३५ वर्षीय पुरुष, धामणगाव येथील ६५ वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ४३ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील कोलारी येथील ५० वर्षीय महिला, पाचगाव येथील ५५ वर्षीय महिला, वडाला पैकु येथील ५३ वर्षीय पुरुष, तर राजुरा तालुक्यातील रामपूर येथील ७७ वर्षीय पुरुष, वणी-नायगाव येथील २६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र ४६१
चंद्रपूर तालुका ८२
बल्लारपूर ४२
भद्रावती २२
ब्रह्मपुरी ५१
नागभीड ६५
सिंदेवाही ७७
मूल २४
सावली ०७
पोंभुर्णा २९
गोंडपिपरी ३१
राजुरा ७६
चिमूर ३६
वरोरा ३६
कोरपना ११२
जिवती ०२
अन्य १७