शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST

सचिन सरपटवार भद्रावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होत नाही, तोच दुसऱ्या लाटेने थैमान घातले अन् लगेच तिसऱ्या ...

सचिन सरपटवार

भद्रावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होत नाही, तोच दुसऱ्या लाटेने थैमान घातले अन् लगेच तिसऱ्या लाटेचीही चाहूल लागली. अशातच भद्रावती तालुक्यातील भटाळी ग्रामपंचायतीसह अन्य सुमारे पंधरा ग्रामपंचायतीच्या विविध गावांमध्ये कोरोनाचा अद्यापही शिरकाव झालेला नाही. कोरोना नियमांचे पालन करीत सकारात्मक भावनेच्या बळावर या गावांनी कोरोनाला दूर ठेवले. कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीमध्ये एका कमिटीची स्थापनाच करण्यात आल्याचे भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांनी सांगितले.

भटाळी ग्रामपंचायतअंतर्गत भटाळी, नंदुरी खुर्द, नांदुरा ही तीन गावे असून अंदाजे लोकसंख्या नऊशे ते हजार इतकी आहे.

कमिटीच्या द्वारे सुरुवातीलाच गावांमध्ये फवारणी करण्यात आली. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. डॉक्टर नंदकिशोर, तसेच आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेवल व ताप तपासण्यात आला. सरपंच रोहणकर हे स्वत: उपस्थित राहत होती. ऑक्सिजन लेवल ९०च्या आत असेल, तर सरपंचांना त्वरित माहिती देऊन रुग्णाची टेस्टिंग करण्यात येत आहे. बाहेरच्या लोकांना गावामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. या गावांमध्ये सरपंच यांच्या उपस्थितीत बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले.

४५ या वयोगटांतील जवळपास सगळ्याच नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही, असा निर्धार सरपंच सुधाकर रोहणकर यांच्यासह गावकऱ्यांनी ठाम निर्धार केला आहे.

टाकळी बेलोरामध्ये कोरोनाला प्रवेश नाही

टाकळी ग्रामपंचायतीमधील बेलोरा गावातही कोरोनाचा शिरकाव नसल्याचे टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण बंदुरकार यांनी सांगितले. ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. गावांमध्ये फवारणी बाबतीत विशेष काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच ठिकाणी विलगीकरण केंद्र

तालुक्यात चंदनखेडा मुधोली, माजरी, नंदुरी, घोडपेठ या ठिकाणी विलगीकरण केंद्र चालू आहे. चंदनखेडा विलगीकरण केंद्रात १६ रुग्ण भरती होते. त्यापैकी पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण २४ उपकेंद्रांवर लसीकरणासाठी टीम तयार करणार आल्या आहे.

मुधोली क्षेत्रातील ग्रामस्थांनी लसीकरणासाठी पुढे यावे

तालुक्यातील विविध क्षेत्रांत लसीकरण याचे प्रमाण चांगले आहे. मुधोली क्षेत्रात त्या प्रमाणात लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता, मनात भीती न बाळगता ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करावे.

- डॉ.संजय आसुटकर, भद्रावती.

कोरोना नियमांचे पालन करा

तालुक्यात अनेक गावांत कोरोनाचा अद्यापही शिरकाव झाला नाही, ही खरच आनंदाची बाब आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही, त्या गावांचे अन्य ग्रामस्थांनी अनुकरण करावे. कोरोना नियमांचे पालन करावे.

- महेश शितोळे, तहसीलदार भद्रावती.