शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर समिती गठित करण्याचा निर्णय

By admin | Updated: March 9, 2016 02:05 IST

चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली.

मंत्रालयात बैठक : चंद्रपुरातील आंदोलनाची आमरण उपोषणानंतर दखलचंद्रपूर : चंद्रपुरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वनशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची दखल अखेर वनमंत्र्यांनी घेतली. या संदर्भात मंत्रालयात मंगळवारी बैठक पार पडली. त्यात या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे वनसंरक्षक कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. मागण्यांची आणि आंदोलनाची दखल घेत नाही हे पाहून या विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले. चार दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या आंदोलनकर्त्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यांच्या निवासाची आणि भोजनाचीही अडचण निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात याची दखल घेऊन वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी ‘आत्मक्लेष’ या मथळ्याखाली एक मजकूर सोशल मिडियावरून पाठविला. तो व्हायरल होत वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचला. वनमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेवून देशमुख यांना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान मोबाईलवरून संपर्क साधला. देशमुख यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची गंभीरता वनमंत्र्यांना सांगितली. अखेर ना. मुनगंटीवार यांनी ८ मार्चला दुपारी २ वाजता मंत्रालयात तातडीची बैठक बोलविली. वनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला वन विभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते. या बैठकीत वनमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही समिती आपला अहवाल देणार आहे. या विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेवून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवी संघटना मदतीसाठी सरसावल्या होत्या. कॅटरर्सचे संचालक अमूल रामटेके यांनी रात्री वेळेवर स्वयंपाक करून मुलामुलींची जेवणाची व्यवस्था केली. अनेक व्यक्तींनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. रोटी बँकेचे चोरडिया व सातपुते यांच्या मदतीने जयश्री गावंडे यांनी त्यांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. ग्रामीण पत्रकार संघानेही उपोषण मंडपाला भेट देऊन मदत दिली. (जिल्हा प्रतिनिधी)