शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीसाठी साडेबारा कोटींचे कर्ज

By admin | Updated: April 28, 2016 00:44 IST

गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा...

ग्रामपंचायतींना मिळाले उत्पन्नाचे स्त्रोत : १५ वर्षांत प्रथमच मोठ्या निधीचे वितरण चंद्रपूर : गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा लोकाभिमुख निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीची संधी निर्माण करुन दिली आहे. १५ वर्षात प्रथमच १२ कोटी ४३ लाख १२ हजार ८७१ रुपयांचा जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज स्वरुपात वाटप केल्याने ग्राम पंचायतीला स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येऊन ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम होतील, असे दिसून येत आहे.ग्रामपंचायतीच्या स्वत:च्या उत्पन्नावर ०.२५ टक्के अंशदान जिल्हा ग्राम विकास निधीच्या जिल्हा स्तरावरील खात्यात ग्रामपंचायतमार्फत जमा केल्या जाते. त्या खात्यावर उपलब्ध असलेल्या निधीतून ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. परंतु ग्रामपंचायती कर्ज घेण्यास इच्छुक नसल्यामुळे १९८५ ते २०१३-१४ पर्यंत केवळ एक कोटी ८० लाख ३० हजार एवढाच निधी कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आला होता.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा ग्राम विकास निधी वितरणाचा २० ते २२ वषार्पासूनचा आढावा घेतला. सदर योजनेचा निधी जिल्हयातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांच्या लक्षात येताच जिल्हा परिषदेकडे १५ वषार्पासून प्रलंबित असलेल्या १५ कोटी ४५ लाख ८० हजार निधीचे नियोजन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील १२ पंचायत समित्यांना १२ कोटी ४३ लाख १२ हजारांचा निधी तात्काळ वितरित केला. या निधीमधून ग्रामपंचायतीला आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यास पाठबळ मिळणार आहे. जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत कर्ज मागणीचे ८६ प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यापैकी 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात ट्रॅक्टर खरेदी, दुकान गाडे बांधकाम, बँक इमारत, मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन, सिमेंट क्राँकेट रोड, बाजार ओटे, स्मशानभूमिचे वॉल कंपाऊंड, सार्वजनिक वाचनालय, कोंडवाना बांधकाम व विश्रामगृह बांधकाम इत्यादीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात कर्ज स्वरुपात निधी वितरित करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. (शहर प्रतिनिधी)