शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:47 IST

८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट १९४२ चिमूर क्रांतिलढा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी पेटून उठली जनता

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्याच्या पे्ररणेने झपाटलेले युवक, वृद्ध व महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. १६ आॅगस्ट १९४२ रोजी सर्कल इन्स्पेक्टर जरासंध, पोलीस कांताप्रसाद, नायब तहसीलदार सोनवाने, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करून इंग्रजांचा युनियन जॅक उतरविला आणि तिरंगा ध्वज फडकविला. सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले. तेव्हा १६ आॅगस्ट १९४२ ला सारा भारत देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते. भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षांच्या कारभारात भारतीयांवर मोठा अत्याचार केला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली होती. याकरिता भगतसिंग, राजगुरू यासारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरूद्ध पेटून उठले.स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चिमूरचा उठाव हे एक सोनेरी पान आहे.१६ आॅगस्टच्या सकाळी काय घडले?महात्मा गांधीजींच्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरूद्ध पेटून उठले. १६ आॅगस्ट १९४२ ला सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली. काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार, सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे, दादाजी किरीमकर, मारोती खोबरे,गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाजवळून निघाली. 'व्हॉइसरॉय दिल्ली मे जुते खाये गल्ली मे' या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली. हा दिवस नागपंचमीचा होता. दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे प्रवचन सुरू होते. या प्रवचनात सुमारे पाचशे नागरिक सहभागी झाले होते. तत्कालीन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजासमोर आपली बाजू मांडली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, ‘तुम्ही आपल्या ठिकाणी योग्य आहात. आपले काम करा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल’ असा सल्ला दिला. आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशभक्तीच्या ज्वालाग्रही विचारांची तेजस्वी भजने सादर केली.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’ या राष्ट्रसंताच्या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटविली. सर्वांच्या मनात क्रांती हाच शब्द घुमत होता. भारत मातेचे स्वतंत्र्य रूप क्रांतीकारकांना दिसत होते. 'गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश मे’ या भजनाने क्रांतिकारक पेटून उठले. यापैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला आणि सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदावर येऊन 'भारत माता की जय' अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून १२ क्रांतीकारकांना तुरूंगात डांबले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन