शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील डाटा आता संगणकीकृत

By admin | Updated: July 6, 2015 00:49 IST

शिक्षण विभागातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती कुणी मागितली

मनुष्यबळ व वेळेची बचत : सरल नावाचे नवे सॉफ्टवेअर विकसितचंद्रपूर : शिक्षण विभागातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती कुणी मागितली तर आता वेळेवर धावपळ करण्याची गरज राहणार नाही. आता ही माहिती कायम संकलित ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ही माहिती कायम संकलित करून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘सरल’ नावाने नवीन सॉफ्टवेअर विकसित केले असून हा सरल उपाय शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती साठवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.शैक्षणिक आणि प्रशासकीय नियोजनासाठी अनेकदा सांख्यिकीय माहितीची गरज असते. परंतु अशी माहिती संकलित नसल्याने ही माहिती गोळा करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना तसेच संबंधित विभागाला वेळेवर धावपळ करावी लागते. यात वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाया जाते, पर्यायाने अध्ययन, अध्यापनावरही परिणाम होतो. केंद्र सरकारच्या युडायस प्रणालीनुसार दरवर्षी राज्यातील सर्व शाळांकडून माहिती संकलित केल्या जाते. या माहितीच्या आधारे शिक्षण विभागाकरिता धोरणात्मक निर्णय घेणे, प्रभावी नियोजन करणे, आर्थिक तरतुदीचे नियोजन केले जाते. परंतु शाळांकडे अशी माहिती उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऐनवेळी माहिती गोळा करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा गोंधळ उडतो. पर्यायाने नव्याने माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांचा वेळ खर्ची जातो. त्यामुळे अध्ययन-अध्यापनावर परिणाम होतो. पैसा, वेळेचाही अपव्यय होतो. शिवाय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणना, आपत्कालीन परिस्थिती व निवडणुका वगळता अन्य अशैक्षणिक कामे देता येणार नाही, अशी तरतूद असल्याने शाळा, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थांची माहिती संकलित करून कायम साठवून ठेवण्यासाठी ‘सरल’ (सिस्टिमॅटिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रीफॉर्म फार अचिव्हिंग लर्निंग बॉय स्टूडंट) या नावाने नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र पुणेद्वारे ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेची, त्या शाळेत कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांची, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीद्वारे आॅनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा या माहितीची गरज पडेल, त्यावेळी ती सहज उपलब्ध होऊ शकेल. शिवाय ही माहिती संकलित करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पैसा आणि वेळेचीही बचत होणार आहे.संस्थेच्या माहितीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा तपशील, संस्थेच्या धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या प्रमाणपत्रांचा तपशील व संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळांची संख्यात्मक माहिती या प्रणालीद्वारे आॅनलाईन करता येणार आहे. तर शाळा विषयक माहितीमध्ये शाळा प्रकार, व्यवस्थापन, शाळा मान्यता, पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव, भ्रमणध्वनी, शाळा तपासणी, शाळांना मिळालेले अनुदान, त्याचा विनियोग, शाळेतील विविध प्रकारच्या समित्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील तरतुदीची माहिती, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, मोफत साहित्याचा पुरवठा, शैक्षणिक व शालेय उपक्रम आदींची माहिती आॅनलाईन संकलित करता येणार आहे. यामुळे शाळेची सद्य:स्थिती समजणार असून त्यानुसार निकषावर आधारित शाळेच्या गरजा स्पष्ट होईल. शिवाय वर्गवार व विषयावर अध्यापनाची सद्य:स्थिती मुख्याध्यापक, पालकांना प्राप्त होणार आहे.शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची त्यांच्या सेवेच्या सर्व तपशीलाची माहिती आॅनलाईन घेतली जाणार आहे. शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, त्यांनी घेतलेले प्रशिक्षण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, वारस नोंदणीचा तपशील, शिकवित असलेले विषय, त्यांचा कार्यभार आदी माहिती संकलित करण्यात येणार असून यामुळे कर्मचाऱ्यांची अद्ययावत सेवापुस्तके आॅनलाईन उपलब्ध होतील, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणविषयक गरजा निश्चित करता येणार आहे. शाळेमध्ये मंजूर, कार्यरत व रिक्तपदांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन करताना त्यांच्या वैद्यकीय तपासण्याबाबतच्या तपशीलासह अन्य संपूर्ण माहिती भरून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक आॅनलाईन होणार आहे. शिक्षकांना वेगळे प्रगतिपुस्तक ठेवण्याची गरज भासणार नाही. (शहर प्रतिनिधी)यांच्याकडे असेल जबाबदारीही माहिती संकलित करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संस्था, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि गटशिक्षणाधिकारी ही माहिती संकलित करतील तर केंद्रप्रमुख किंवा शिक्षणाधिकारी ही माहिती अंतिम करतील आणि शिक्षण उपसंचालक किंवा गटशिक्षणाधिकारी या माहितीची पडताळणी करतील. यासाठी संबंधितांना स्वतंत्र लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. त्यामुळे ही माहिती संपूर्णपणे गोपनीय राहणार आहे.