शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त धरणातील गाळपेर जमीन वाहिनीपासून वंचित

By admin | Updated: March 28, 2017 00:31 IST

धरणातील गाळपेर जमीन ही धरणात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देणे बंधनकारक आहे.

जमिनीवर अतिक्रमण : लाखों रुपयांचा महसूल बुडालावरोरा : धरणातील गाळपेर जमीन ही धरणात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देणे बंधनकारक आहे. परंतु, गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन अतिक्रमणधारक लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. परिणामी पाटबंधारे विभागाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनीतून पीक घेण्यापासून मागील कित्येक वर्षापासून वंचित झाले आहे.वरोरा तालुक्यातील चारगाव धरणात आकोला गिरोला, राळेगाव, बोरगाव, पारडी, उमरी, सावरी चारगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत. खरीप हंगामात चारगाव धरणातील पाणी कमी झाल्यानंतर शिल्लक असलेली गाळपेर जमिनीत पीके घेण्याकरिता पाटबंधारे विभागाने धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून भूभाडे घेवून दिल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून या नियमाला तिलांजली दिल्याने या गाळपेर जमिनीवर इतर शेतकरी अतिक्रमण करुन लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहे. यामध्ये शासनासाला कुठलाही महसूल अतिक्रमण धारकांकडून मिळत नाही. मागील वर्षी पाटबंधारे विभागाने धरणग्रस्त शेतकऱ्यांना गाळपेर जमिनीकरिता अर्ज मागीतले होते. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करुन प्रत्येकांने एक हजार रुपये भूभाडे अदा केले होते. त्यानंतर गाळपेर जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाची प्रक्रिया विलंबाने झाली. त्या जमिनीवर अतिक्रमण करुन पिके घेण्यात आले होते. त्यामुळे धरणग्रस्तांना रक्कम अदा करुनही गाळपेर जमिनीवर पिके घेता आले नाही. यावर्षीही पाटबंधारे विभागाने गाळपेर जमिनी वाटपासंदर्भात धरणग्रस्तांकडून अर्ज मागीतले. धरणग्रस्तांनी अर्ज करुन भूर्भाडे अदा केले. परंतु, आता मार्च महिनाही निघून गेला. मात्र अद्यापही धरणग्रस्तांना गाळपेर जमिनीचे वाटप करण्यात आले नाही.(तालुका प्रतिनिधी)पीक घेण्यापासून शेतकरी वंचितधरणातील गाळपेर जमीन प्रकल्पग्रस्तांना वाहिनीकरिता देण्याचा नियम आहे. मात्र या गाळपेर जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे गाळपेर जमिनीतून पीक घेण्यापासून शेतकरी वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे अािर्थक नुकसान होत आहे. पूर्वी संकटात सापडलेला शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. २९ मार्चला जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठकधरणग्रस्तांनी गाळपेर जमिन मिळत नसल्याची आपली व्यथा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली. त्यांनी तातडीने २९ मार्चला बैठक घेण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे धरणग्रस्ताचे लक्ष लागले आहे. पीक लिलावाची प्रक्रिया रेंगाळलीमागील वर्षी गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन पीक घेण्यात आले. ही पिके अतिक्रमण करुन घेण्यात आल्याने पाटबंधारे विभागाने पीक जप्त करण्याची कारवाई केली अतिक्रमणधारक उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी अतिक्रमणधारकांच्या विरोधात निकाल लागला. त्यामुळे अतिक्रमण जागेवरचे पिकांचा लिलाव करण्याची घोषणा केली. ही घोषणा हवेतच विरली. अतिक्रमणधारकांनी पीक घेतल्यानंतरही शासनाला महसुलापासून वंचित रहावे लागत आहे.