शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर सायबर सेलची नजर

By admin | Updated: September 16, 2014 23:37 IST

विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची नजर राहणार आहे. नागरिकांनी व मतदारांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा,

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची नजर राहणार आहे. नागरिकांनी व मतदारांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. प्रशासन व पोलीस विभागाने निवडणुकीच्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाच्या सभागृहात आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे व सर्व निवडणूक अधिकारी तथा पोलीस अधिकारी उपस्थित होते.निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अनावश्यक रोख रक्कम घेवून जाण्याचे नागरिकांनी टाळावे असे सांगताच सबळ पुरावे नसल्यास रक्कम जप्त करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी भेट वस्तु अथवा दारू यासारख्या बाबी निर्देशनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणीचे ठिकाण तात्काळ निश्चित करावे त्याचप्रमाणे या ठिकाणी लागणारी सुरक्षा याबाबत ताबडतोब निर्णय घेवून तसे कळवावे. प्रचार साहित्य छापणाऱ्या प्रिटिंग प्रेसला निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे साहित्य छपाई करण्याच्या सूचना देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी. मिरवणुकीचे मार्ग व सभास्थळ याबाबतची परवानगी देताना दोन उमेदवारांचा एकच मार्ग अथवा एकच स्थळ आणि वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी. स्टार प्रचारक यांच्यासाठी लागणाऱ्या हेलीकॉप्टरची परवानगी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर देण्यात येईल. जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले की, आचारसंहितेचे उल्लंघन, दारू व रोख रक्कम आदी बाबतचे गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंदवून त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावी. निवडणूक असल्यामुळे या कामात हयगय करू नये असे निर्देश त्यांनी दिले. रोख रक्कम वहानासंबंधी सबळ पुरावे असल्यास सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिल्या. (नगर प्रतिनिधी)