शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनी संघटित होणे गरजेचे

By admin | Updated: February 21, 2016 00:33 IST

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

सुधीर मिसार : ग्राहक संरक्षण कायद्यावर जनजागृतीचंद्रपूर : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी वर्गाने स्वत: जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे आणि एक आदर्श ग्राहक म्हणून या देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी सर्व ग्राहकांनी संघटीत होणे ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुधीर मिसार यांनी केले.सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर वाणिज्य विभागाद्वारे आयोजित ग्राहक संरक्षण कायदा व जनजागृती याविषयावर आयोजित मार्गदर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के.बी. मोहरीर, मुख्य मार्गदर्शन तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुधीर मिसार आदींची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना सुधीर मिसार यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून विविध पातळीवर होणारी फसवणूक एम.आर. पी. अन्नसुरक्षा कायदा स्वत: औषध, आरोग्य शिक्षणाचा मुलभूत अधिकार, माहितीचा अधिकार अशा विविध विषयांवर विविध आरक्षणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आर.पी. इंगोले यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भूमिका स्पष्ट करताना वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याची उपयुक्तता, गरज आणि आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना या विषयाचे महत्त्व कळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)