शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हा तर अमानुषतेचा कळस

By admin | Updated: September 5, 2015 00:55 IST

एका निरपराधाला इतक्या निर्दयपणे मारहाण करणे हा अमानुषतेचा कळसच आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पालकमंत्री व्यथित : सुधीर मुनगंटीवारांनी घेतली बोथरा कुटुंबाची भेटचंद्रपूर : एका निरपराधाला इतक्या निर्दयपणे मारहाण करणे हा अमानुषतेचा कळसच आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.शुक्रवारी दुपारी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोेलिसांच्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोहीत बोथरा याच्या घरी भेट दिली. रोहीतच्या कुटुंबियाने ना.मुनगंटीवार यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. घटनेचा वृत्तांत ऐकून ना.मुनगंटीवारही व्यथित झाले. एखाद्या निरपराध युवकाला कोणतीही विचारपूस वा चौकशी न करता अशा पद्धतीने मारहाण करणे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. याप्रसंगी रोहीतच्या कुटुंबीयाने घटनाक्रम सांगताना, पोलिसांच्या दंडेलीचे अनेक किस्से पालकमंत्र्यांना ऐकविले. रोहीतला मारहाण करतानाच रोहीतने चिमूरच्या ज्या व्यापाऱ्याकडून वसुलीची रक्कम आणली, त्याला फोन करून रोहीतने कोणती दारू आपल्याला आणून दिली, असा प्रश्न वारंवार विचारला. मात्र संबंधित व्यापाऱ्याने दारूचा आणि रोहीतचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र तरीही रोहीतला बेदम मारहाण केली जात होती. परंतु ही मारहाण अंगावर शेकण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. मात्र शहरातील काही प्रतिष्ठांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणात हस्तक्षेप केला. वस्तुस्थिती मांडली. त्यामुळे पोलीस त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू शकले नाहीत, अशी माहितीही बोथरा कुुटुुंबियांनी पालकमंत्र्यांना दिली. या प्रकरणी मी स्वत: पोलीस अधिक्षकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोथरा कुटुंबियाच्या भेटीनंतर ना.मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोहीतची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी नगरसेवक रितेश तिवारी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वडील आणि भावाला धक्काबुक्कीपोलिसांनी रोहीतला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर रोहीतचे वडील रमेश बोथरा व भाऊ आकाश तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी वडील आणि भावालादेखील पोलिसांनी धक्काबुक्की करून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. त्या अधिकारी कर्मचाऱ्याला बडतर्फ करारोहीत बोथरा याला कोणताही अपराध नसताना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बोथरा कुटुंबियाने केली.मारहाण प्रकरणाचे गडचिरोलीत पडसादरोहित बोथरा प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी गडचिरोलीतही उमटले. अशा घटना वारंवार होऊ नये याकरिता संघटीत राहून या घटनेचा निषेध करण्यात आला. अशा आशयाचा ठराव दि गडचिरोली मर्चटस् असोसिएशनच्या एका बैठकीत शुक्रवारी पारित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष गुरूदेव हरडे, सहसचिव फरिद नाथानी, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर आदी उपस्थित होते. हंसराज अहीर यांनीही घेतली भेटकेंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही शुक्रवारी दुपारी बोथरा कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. घडलेली घटना अमानुष असून या प्रकरणी आपण जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या असल्याचे ना.अहीर यांनी बोथरा कुटुंबीयाला सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार नाना शामकुळे व भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.