शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारंीच मिळवितात सीटीपीएसचे कंत्राट

By admin | Updated: July 7, 2015 01:00 IST

कंपनीत सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीतील कंत्राट घेता येत नाहीत अथवा त्यासाठी फर्मही तयार करता येत नाही.

हितसंबंधासाठी नियम धाब्यावर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकारचंद्रपूर : कंपनीत सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीतील कंत्राट घेता येत नाहीत अथवा त्यासाठी फर्मही तयार करता येत नाही. असे असले तरी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे फर्म बनवून करोडो रूपयांची कामे मिळविल्याचा नवा प्रकार पुढे आला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सेवा विनियमच्या पान क्रमांक १०० वरील अनुसूची ‘ख’ मध्ये कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या गैरवर्तणुकीच्या कृत्याची यादी दिली आहे. या अनुसूचितील २५, २६ आणि ३३ व्या क्रमांकाच्या मुद्यानुसार, महाजनकोमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला अथवा त्यांच्या कुटुंबियांना महाजनकोच्या बाहेर व्यापार अथवा व्यवसाय करायचा असल्यास त्याची माहिती कंपनीच्या सेवा तरतुदीनुसार व्यवस्थापनाला द्यावी लागते. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील काही कर्मचारी पत्नीच्या अथवा मुलांच्या नावे फर्म तयार करून त्या माध्यामतून करोडो रूपयांचे कंत्राट घेत आहेत. नव्या कंत्राटदारांना प्रवेश कठीणसीटीपीएसमध्ये निर्माण झालेल्या कर्मचारी-कम-कत्रांटदार या साखळीने बाहेरील नव्या कंत्राटदारांना जवळपास नो एंट्री केली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संधान साधून कंत्राट मॅनेज करायचे आणि काम साधायचे असा हा प्रकार आहे. कंत्राटारांच्या या साखळीमुळे सीटीपीएसमध्ये नेमके काय चालते, याचा पत्ताच बाहेरच्या मंडळींना लागत नाही. तो लागू नये याची खबरदारीही ही मंडळी घेत असल्याने अनेक घोटाळे आतल्या आतच दडपले जातात, अशीही माहिती आहे.