शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

शाळा सुरू होताच दुकानात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

मूर्तिकारांमध्ये पसरलेय नैराश्य चंद्रपूर : गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे. मात्र कोरोनाने यंदाही उत्सव साजरा करता येणार की नाही, ...

मूर्तिकारांमध्ये पसरलेय नैराश्य

चंद्रपूर : गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे. मात्र कोरोनाने यंदाही उत्सव साजरा करता येणार की नाही, याबाबत सांशकता आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये नैराश्य पसरले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक सण उत्सव साजरे करण्यावर बंदी आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करता येणार की, नाही, असा प्रश्न आहे.

हात धुण्याचे यंत्र बसणात

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हात धुण्याचे यंत्रचौका-चौकात बसविण्यात आले होते. मात्र ते यंत्राची नासधूस झाली आहे. बहुतेक ठिकाणी तर पाणीच नसल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी महिनाभरापासून पाणीच बदलविण्यात आले नाही. याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष आहे.

एक खिडकी योजना राबवावी

चंद्रपूर : १५ जुलैपासून आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज भासत आहे. त्यामुळे शासनाने एक खिडकी योजना राबवून त्याठिकाणी शालेय स्तरावरील सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबतची उपाययोजना राबवावी, अशी मागणी पालक वर्गांकडून होत आहे. हा उपक्रम राबविल्यास कोरोनाच्या सावटात पालक व विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार आहे.

नेटकॅफेच्या दुकानांची वेळ वाढवावी

चंद्रपूर : कोरोनामुळे सर्व दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आहे. मात्र ग्रामीण भागात नेट उपलब्ध राहत नसल्याने नेटसंदर्भातील कामे करण्यास अडचण जाते. त्यामुळे नेट कॅफेची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पीक विमा योजना, विविध नोकर भरती संदर्भातील अर्ज भरण्यास नेटअभावी अडचण जाते.

पाण्याच्या नमुन्याची तपासणी करावी

चंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने नळाद्वारे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना पोटाचे विकार जाणवत आहेत. त्यामुळे पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

प्रदूषण करणाऱ्या वाहनावर कारवाई करा

चंद्रपूर : अनेकांनी आपल्या दुचाकी वाहनावर मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावले आहेत. गर्दीचे ठिकाण हेरुन वाहनचालक मोठ्या प्रमाणात आवाज करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ही बाब टाळण्यासाठी असा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस एकट्या मुलींना हेरुन त्याची छेडछाड करण्याच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे. जर मुलींना कराटे येत असल्यास त्या आपले रक्षण स्वत:च करू शकतात. त्यामुळे मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.