शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आटलेल्या धरणात पिकांची लागवड

By admin | Updated: January 6, 2016 01:29 IST

उन्हाळा लागणाऱ्याला कित्येक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना वरोरा तालुक्यातील चंदई लघु धरण काही दिवसांपूर्वीच आटले आहे.

वरोरा तालुका : उन्हाळ्यापूर्वीच चंदई लघु धरण पडले कोरडेवरोरा : उन्हाळा लागणाऱ्याला कित्येक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना वरोरा तालुक्यातील चंदई लघु धरण काही दिवसांपूर्वीच आटले आहे. धरण आटताच काही शेतकऱ्यांनी संपूर्ण धरणात नांगरणी करुन पिके घेण्यास सुरुवात केली आहे.वरोरा तालुक्यातील निमढेला गावानजीक चंदई लघु धरण आहे. या धरणात ताडोबा लगतच्या रामदेगी जंगलातील टेकड्या नाले यामधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येवून त्याची साठवणूक होते. धरणातील पाण्याचा उपयोग सिंचनाकरिता होतो. धरण परिसरात जंगल असल्याने जंगली प्राणी पाणी पिण्याकरिता धरणात येत असतात. चंदई नाला धरण बांधून कित्येक वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी लिकेजस असल्याने पाणी वाहून जात असते. सोबतच धरणातील गाळ मागील काही वर्षापासून काढण्यात आला नसल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. उन्हाळा येण्याला बराच कालावधी शिल्लक असताना धरण कोरडे पडले. त्यामुळे या संपूर्ण धरणात शेतकऱ्यांनी नांगरणी करीत पिके घेणे सुरू केले आहे. निमढेला व परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेवून चंदई लघु धरणातील ३० टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवण्याची मागणी केली होती. पाणी धरणात राहिल्यास धरणालगतच्या गावातील पाण्याची पातळी कायम राहून उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणी शिल्लक ठेवण्याचे आदेश काढले. परंतु आदेशाची अंमलबजावणी न केल्याने धरण कोरडे पडले आहे. (तालुका प्रतिनिधी)