शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

एकाच दिवशी १५ कोेटी ४३ लाखांचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:40 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल कार्यालयामध्ये एकाच दिवशी खरीपपूर्व पिककर्ज वाटप करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयोगाला यश आले असून मंगळवारी एकाच दिवशी १५ कोटींपेक्षा अधिक कर्ज आॅन द स्पॉट वाटप करण्यात आले़ मेळाव्याला सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली असून त्यापैकी एक हजार ७९४ शेतकऱ्यांना मेळाव्यातच धनादेश वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देतालुकास्तरीय कर्ज वाटप मेळावा : पाच हजार शेतकऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल कार्यालयामध्ये एकाच दिवशी खरीपपूर्व पिककर्ज वाटप करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयोगाला यश आले असून मंगळवारी एकाच दिवशी १५ कोटींपेक्षा अधिक कर्ज आॅन द स्पॉट वाटप करण्यात आले़ मेळाव्याला सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली असून त्यापैकी एक हजार ७९४ शेतकऱ्यांना मेळाव्यातच धनादेश वाटप करण्यात आले.हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या पुढाकारात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ राजुरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल आदी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले़ तर ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, सिंदेवाही याठिकाणी अन्य १५ कोटी ४३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले.जिल्ह्यासाठी या हंगामामध्ये सर्व बँकांमार्फत कर्ज वाटप करण्याबाबत महिनाभरापूर्वी सूचना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकºयांनी यापूवीर्ही बँकांशी संपर्क साधला होता. मात्र, मेळाव्यामुळे अनेक शेतकºयांची सुविधा झाली़ प्रलंबित प्रकरणांचा निपटारादेखील वरिष्ठ अधिकाºयांच्या मदतीने तहसील कार्यालयातच करण्यात आला. ज्या ४ हजार ८०१ शेतकºयांनी आज उपस्थिती लावली़ त्यापैकी एक हजार ७९४ शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आला. उर्वरित पात्र शेतकºयांना बँक शाखेमार्फत आठ दिवसात पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. अपुरे कागदपत्र असणाºयांना शेतकऱ्यांनाआठ दिवसात बँक शाखा कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज वाटप करणार आहे. मंगळवारी मिळालेला प्रतिसाद बघता पुढील काळातदेखील कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत जिल्हा प्रशासन विचार करीत आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे. राजुरा व जिवती तालुक्यामध्ये मंगळवारी कर्ज वाटप होऊ शकले नाही. जिल्हा प्रशासनाने याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची यादी तपासता आली. याशिवाय बँकेकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कारणांची अधिकाऱ्यांनी उपस्थितीत खात्री केली़ कर्ज देताना येणाऱ्या अडचणींना तत्काळ सोडविण्याची सूचनाही दिली़ त्यामुळे महसूल व अन्य विभागाकडून बँकेला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे़तालुकानिहाय कर्जवाटपचंद्रपूर तालुक्यात ३०० शेतकऱ्यांनी भेट दिली़ या ठिकाणी ५० लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले. भद्रावती तालुक्यात७०़ ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. बल्लारपूर तालुक्यात दीडशे शेतकºयांनी मेळाव्याला भेट दिली. ७.९५ लाख कर्ज वाटप करण्यात आले. सावली तालुक्यांमध्ये४५० शेतकऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली. २२. ३१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. चिमूर तालुक्यामध्ये ५५० शेतकऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली असून ७३६. ३९ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले़ मुल येथे ४७९ शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली़ ४७. २२ लाख वाटप करण्यात आले. कोरपना येथे ३५० शेतकऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली़ ६४.११ लाखांचे वाटप करण्यात आले. गोंडपिंपरी तालुक्यामध्ये ५८३ शेतकऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली़ ३५५ ़३६ लाख, पोंभूर्णा १११ शेतकºयांनी भेट दिली. ८. ८४ लाख, सिंदेवाही तालुक्यामध्ये २९१ शेतकऱ्यांनी भेट दिली. १८. ५५ लाख, नागभीड तालुक्यामध्ये ३३६ शेतकऱ्यांनी भेट दिली़ ४८. ४ रुपयांचे वाटप करण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये चारशे शेतकऱ्यांनी भेट दिली़ ७१़ ४ लाख वाटप करण्यात आले.