शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था केली असली तरी नागरिक मात्र याबाबत कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. शहरातील काही भागात घंटागाड्यांना प्रतिसाद न देता नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महानगर पालिकेने शहरातील घनकचरा संकलन करण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी घंटागाड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. मात्र मोठ्या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण घरातील कचरा खाली उतरून घंटागाडीपर्यंत नेऊन देण्यासाठी कंटाळा करतात. नंतर जेव्हा जास्त कचरा जमा होतो. तेव्हा मग तो कचरा मिळेल त्या ठिकाणी फेकल्या जातो. शहरातील अनेक भागात असा प्रकार सुरू असल्याने घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील तुकूम परिसरातील प्रभाग दोनमध्ये कारमेल अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा, शिळे अन्न, प्लॉस्टिक पिशव्या टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळ्या पदार्थांची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा जीवजंतू यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेऊनच पुढे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मोकाट जनावरांपासून धोका४घनकचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा कळप उभा असतो. त्यामुळे या जनावरांपासून विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा४एकीकडे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे, तर दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे. या घनकचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मलबा रस्त्यावर४शहरातील विविध वॉर्डात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. मात्र नाल्यातील मलबा एकतर नालिच्या काठावर अथवा रस्त्यावर टाकला जातो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या मलब्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. नालितून काढण्यात येणारा मलब्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.