शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

‘त्या’ गुन्ह्याला क्षमा नसावी

By admin | Updated: October 28, 2016 00:48 IST

आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले.

सामाजिक तेढीची घटना : मानवी विकृतीमुळे सामाजिक असंतोषब्रह्मपुरी : आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले. या नराधमाने केलेले कृत्य हे मानवी मनाला कलंकीत करणारे असून समाजात दुफळी माजविणारे आहे. अशा कौर्यकर्माला क्षमा नसावी, अशी भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.मृत मुलीचे वय खेळण्या-बागडण्याचे होते. अकरावीत शिक्षण घेत असताना आपण काही तरी मोठे होऊन घरचे अठराविश्व द्रारिद्य कमी करावे. घराण्याचे व समाजाचे नाव मोठ करावे, असा ध्यास कदाचित असावा. पण आपल्याच नाते संबंधातील व्यक्ती असा प्रसंग आपल्यावर कधीही करणार नाही, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. नराधम राजेंद्र हा ३५ वर्षाचा असल्याने त्याने आपल्या परिपक्वतेच्या आधारावर पीडित मुलगी बहिणीसारखी आहे. तिच्या व आपल्या वयात दुप्पट अंतर आहे. आपल्याला पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा कुटुंब आहे. त्याने या साऱ्या विवेकबुद्धीचा विचारच केला नसल्याने समाजाला, घराण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे.मृत मुलीचे आई-वडील, लहान दोन बहिणी व त्याहून एक लहान भाऊ या सर्वाची जबाबदारी दोन- तीन वर्षानंतर तिला पेलायची होती. तो आधारच निघून गेला, याचे शल्य आईच्या डोळ्यात दिसून येत होते. पडके घर, दोन वेळेचे पुरेसे जेवन नाही. घालायला चांगले कपडे नाहीत, याचे तरी भान नराधम राजेंद्रने ठेवले नाही.उलट, भाऊ ! जाताना मला आवाज देशील. मी तुझ्या सायकलवर येईन, असा तिने विश्वास ठेवला. पण त्याने मात्र घात केला. ही विकृती केवळ मानवी विचारातून निर्माण झाली असते. त्याला जात, समाज हा संबंध नसतो. पण नंतर मात्र हा संबंध जोडल्या जाऊन काहूर माजविले जाते. तेव्हा कायदा-सुव्यवस्था, पोषक वातावरण, सामाजिक सलोखा, असुरक्षतेची भावना न कळत जन्माला येत असते. ते समाज, जात, नेते, आणि जे-जे कोणी जाणकार आहेत, त्यांनी स्वत: समजून व व इतरांना समजवून सांगण्याची ही घटना आहे. केलेले कृत्य हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. स्कार्पने गळा आवळते. नंतर स्कार्प सोडून वाचली तर काय होईल, या भीतीपोटी तिच्याच अंगावरचे कपडे फाडून त्याच्या चिंध्या करुन दोरी तयार करणे आणि त्या दोरीने हात बांधून ठेवणे, ही ‘विनाशकालीन बुद्धी’, जसी त्याला सूचली, त्यापेक्षा हे कृत्य करण्यापूर्वी सद्बुद्धीने विचार केला असता तर या खून झालेल्या अल्पवयीन मुलीवर ही पाळी आली नसती. (तालुका प्रतिनिधी)मानवी विकृतीची झळ समाजालामानवी विकृती ही मनुष्यामध्ये निर्माण होते. त्याला कोणताही समाज असे कृत्य करायला सांगत नाही. तरीही समाजा-समाजामध्ये वादळ माजविल्या जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे समाजमन असलेल्या प्रत्येकाला वाटत असते. समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना अशा प्रवृत्तीमधून येत असतात. पण ही प्रवृत्ती केवळ एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीची स्वतंत्र राहत असते. मात्र, त्याची झळ दोन समाजातील व पर्यायाने सर्व जनतेला भोगावी लागते. ते कुठेतरी थांबण्याची व समजून घेण्याची पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक झाले आहे.